कोलकाता : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवनं हॅट्रिक घेतली आहे. ३२ व्या ओव्हरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलला कुलदीपनं ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही बॅट्समनना तंबूचा रस्ता दाखवला. हॅट्रिक घेताना कुलदीपनं मॅथ्यू वेड, अॅश्टन अगर आणि पॅट कमिन्स यांचा बळी घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा खेळाडू बनला आहे. याआधी चेतन शर्मानं १९८७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तर कपील देवनं श्रीलंकेविरुद्ध १९९१मध्ये हॅट्रिक घेतली होती.