IPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरल
IPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता.
IPL 2024: आयपीएलमध्ये 50 वा सामना सनराझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिंसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टीमने राजस्थानला जिंकण्यासाठी 202 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र यावेळी हैदराबाद फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण मैदानात गदारोळ माजला होता. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अंपायरलने हेडला दिलं नॉट आऊट
आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता. यासाठी तो क्रीझच्या बाहेर आला, मात्र बॉल आणि बॅटमध्ये संपर्क होत नव्हता. त्यानंतर संजू सॅमसनने स्ट्रायकर एंडच्या दिशेने चेंडू फेकला आणि तो स्टंपला लागला. दरम्यान यावेळी हेड आऊट होता की नॉट आऊट यावरून प्रश्न उपस्थित झाला.
हे प्रकरण थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आलं. त्यानंतर अंपायरने ट्रॅव्हिस हेडला नाबाद दिलं. रिप्ले पाहिल्यावर हेडची बॅट स्टंपचे लाईट्स लागण्यापूर्वी हवेत असल्याचं स्पष्ट झालं. हेड बाद होईल अशी आशा राजस्थानच्या खेळाडूंची होती. मात्र यावेळी थर्ड अंपायरचा निर्णय राजस्थानच्या विरोधात गेला आणि नॉट आऊट करार दिला.
कुमार संगाकारा संतापला
राजस्थान रॉयल्सचे कोच आणि डायरेक्टर कुमार संगकारा अंपायरशी वाद घालताना दिसला. अंपायरच्या निर्णयावर तो अजिबात खूश नसल्याचं दिसून आलं. यावेळी संगाकारा चांगलाच संतापलेला दिसत होता. यानंतर पुढच्याच बॉलवर ट्रॅव्हिस हेड क्लीन बोल्ड झाला. आणि अखेरीस आवेश खानला त्याची विकेट मिळाली.
ट्रेविस हेडचं अर्धशतक
राजस्थान रॉयल्सविरुद्ध ट्रॅव्हिस हेडने उत्तम फलंदाजी केली. त्याने 44 बॉल्समध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांसह 58 रन्स केले. त्याच्याशिवाय नितीश कुमार रेड्डीने 42 चेंडूत 76 रन्स केले. या खेळाडूंमुळेच हैदराबादची टीम 20 ओव्हर्समध्ये 201 रन्स करू शकली. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.