मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला. जेव्हा शेनचं निधन झालं, तेव्हा त्याच्यासोबत चार मित्र होते. त्यांनी शेनचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. मृत्यूपूर्वी 20 मिनिटं त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मित्रांच्या प्रयत्नांनंतर देखील शेन वाचू शकला नाही. शुक्रवारी शेन थायलँडच्या एका रिसॉर्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. 


जेव्हा शेनचे मित्र त्याला उठवण्यासाठी त्याच्या रुममध्ये गेले तेव्हा तो बेशुद्ध होता. त्याला मित्रांनी उठवण्याचा प्रयत्न केला. 20 मिनिटं त्याला सीपीआर (Cardiopulmonary resuscitation) देखील दिला गेल्याचं मित्रांनी सांगितलं. 


त्यानंतर शेनला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं. पण मित्रांचे सगळे प्रयत्न फेल ठरले. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या मृत्यूमुळे फिरकीचा जादूगार हरपल्याची भावना क्रिकेट विश्वातून व्यक्त केली जात आहे.