मुंबई : टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (M S Dhoni) भारतीय संघाचे मेंटॉर बनवून BCCI ने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. धोनी जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्रिकेटर राहिला आहे. धोनी क्रिकेटचा खेळ उत्तम प्रकारे समजून घेण्यास तज्ज्ञ आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 साली टी-20 विश्वचषक आणि 2011 मध्ये आयसीसी वनडे विश्वविजेतेपद पटकावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीची नियुक्ती मेंटॉर म्हणून करण्यात आल्याने तो यानंतर IPL मध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे. कारण एका खेळाडूला 2 जबाबदार्या घेता येत नाही. त्यामुळे या वर्षीच्या आयपीएलमध्ये धोनी दिसणार नाही अशी चर्चा आहे. धोनी आता भारतीय संघाचा मेंटॉर म्हणूनच कायम राहण्याची शक्यता आहे.


रवी शास्त्रींवर टांगती तलवार


रवी शास्त्रींचा करार वाढवला नाही तर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते अशीही चर्चा आहे. हा प्रयोग किती चांगला सिद्ध होईल हे पुढच्या महिन्यात जेव्हा यूएई आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक मेगा स्पर्धा सुरू होईल तेव्हा दिसेल.


बोर्ड मात्र धोनीकडे शास्त्रींना रिप्लेस म्हणून पाहत आहे. जर भारताने टी-20 विश्वचषक जिंकला आणि रवी शास्त्रींनी निवृत्तीचा निर्णय घेतला, तर धोनी निश्चितच प्रबळ दावेदार असेल.


आयसीसी टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. जरी बीसीसीआयने अधिकृतपणे याचा खुलासा केलेला नाही. वास्तविक ही स्पर्धा आयपीएल फायनलनंतर काही दिवसांनी सुरू होईल. आयपीएलचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.


T20 world cup स्पर्धेचे वेळापत्रक


पहिल्या फेरीत 8 संघांमध्ये 12 सामने होतील. यापैकी चार (प्रत्येक गटातील पहिले दोन) सुपर 12 साठी पात्र ठरतील. आठपैकी चार संघ (बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी) पहिल्या आठ क्रमांकाच्या टी 20 संघांमध्ये सामील होऊन सुपर 12 साठी पात्र ठरतील.


यानंतर 30 सामने सुपर 12 फेजमध्ये खेळले जातील. जे 24 ऑक्टोबरपासून सुरू होईल. सुपर 12 मध्ये, संघ प्रत्येकी सहाच्या दोन गटांमध्ये विभागले जातील. दुबई, अबू धाबी आणि शारजाह या संयुक्त अरब अमिरातीमधील तीन ठिकाणी खेळले जातील. यानंतर बाद फेरीत दोन उपांत्य सामने आणि एक अंतिम सामना होईल.