मुंबई :  'भारतरत्न' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) अनंतात विलीन झाल्या. सर्वांनी साश्रू नयनांनी दीदींना अखेरचा निरोप दिला. दीदींच्या जाण्याने देशावर शोककळा पसरली. विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान दीदींच्या जाण्याने पाकिस्तानही भावूक झाला. पाकिस्तानच्या आजी माजी क्रिकेटपटू आणि पीसीबीनेही दीदींना श्रद्धांजली दिली. (lata mangeshkar passed away pakistan cricketers and pcb pay tributes to legendary singer)  
 
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद हफीज, वकार यूनुस आणि पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांनी दीदींच्या निधनामुळे ट्विटद्वारे शोक व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"दीदींच्या निधनामुळे एका सुवर्ण युगाचा अंत झाला. दीदींचा जादुई आवाज हा लाखो लोकांच्या मनात कायम राहिल", असं बाबरने ट्विटमध्ये म्हटलंय. तर "मेरी आवाज ही  पहचान है", असं ट्विट मोहम्मद हाफीजने केल.     


पीसीबीकडूनही श्रद्धांजली 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सर्वेसर्वा आणि माजी कर्णधार रमीज राजा यांनीही दीदींना आदरांजली दिली. "लता मंगेशकर कृपा, नम्रतेच्या प्रतिमूर्ती होत्या त्यामुळेच त्या महान होत्या.  किशोर कुमार कुमार यांच्यानंतर आता दीदींच्या मृत्युमुळे माझं संगीत संपलंय", असं ट्विट रमीज राजाने केलं.  


डॅरेन गंगा काय म्हणाला? 


दरम्यान वेस्टइंडिज माजी क्रिकेटर डॅरेन गंगाने शोक व्यक्त केलं. तुमचं संगीत ऐकून मी कॅरेबियनमध्ये मोठा झालोय. तुमचं संगीत आमच्या मनात कायम राहिल", अशा शब्दात डॅरेन गंगाने आपल्या भावन्या व्यक्त केल्या.