मुंबई : टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2021 नंतर या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता नवीन कर्णधार कोण असणार असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होतो. काहींच्या मताप्रमाणे कोहलीने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेऊ नये. मात्र एका माजी क्रिकेटपटूच्या म्हणण्याप्रमाणे, कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याचा त्याला फायदा होणार आहे.


'विराटला कर्णधारपद सोडण्याचा फायदा होईल'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 फॉरमॅटमध्ये विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियाला किती फायदा होईल हे आता सांगणे कठीण आहे. पण 'लिटल मास्टर' सुनील गावस्कर यांनी कर्णधारपद सोडल्याचा विश्वास व्यक्त केला की, कॅप्टन्सी सोडल्याच्या निर्णयाने कोहलीवर दबाव कमी होईल.


कर्णधाराची जबाबदारी अधिक


सुनील गावस्कर एका वृत्तवाहिनीसी बोलताना म्हणाले, "जेव्हा तुम्ही कर्णधार बनता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचा विचार करू शकत नाही. त्याला एका फलंदाजाशी बोलावं लागतं जो वाईट टप्प्यातून जात असतो किंवा गोलंदाजाशी रणनीतींवर चर्चा करतो."


कर्णधार असल्यावर लक्ष विचलित होतं


सुनील गावसकर पुढे म्हणाले, "या सगळ्यात गरजेनुसार स्वतःच्या खेळाकडे लक्ष देता येत नाही. जेव्हा तुमच्यावर कोणतंही दडपण नसतं, तेव्हा तुम्ही तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकता."


विराट आयसीसी ट्रॉफी जिंकेल का?


विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाखाली टीम इंडियासाठी एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे या स्पर्धेद्वारे तो हे वाक्य खोडून काढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


विराट 2 वर्ष शतकं करू शकलेला नाही


T20 वर्ल्डकपनंतर सर्वात कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीवर वरून कमी दबाव असेल. त्याला गेल्या 2 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेलें नाही, त्यामुळे आता तो शतक झळकावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.