एका झटक्यात हिरोचा व्हिलन बनला टीम इंडियाचा हा खेळाडू, पाहा काय कारण?
हातातील नोकरी सोडून क्रिकेटकडे वळला पण तिथेही संधी मिळेना...टीम इंडियासाठी व्हिलन बनलेला हा खेळाडू संन्यास घेणार?
मुंबई : टीम इंडियाचा सर्वोत्तम आणि एकेकाळी हुकमी एक्का मानला जाणार टीम इंडियाचा स्टार खेळाडू अचानक गायब झाला. तो अचानक गायब का झाला याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये हा खेळाडू सर्वात जास्त घातक ठरला मात्र त्यानंतर कुठेच नाही दिसली.
हा खेळाडू एका क्षणात नायक ते टीम इंडियाचा खलनायक ठरला. वरून चक्रवर्ती वर्ल्ड कप 2021नंतर फार कुठे खेळताना दिसला नाही. टीम इंडियात रवी बिश्नोईसारख्या घातक लेगस्पिनरच्या एन्ट्रीनंतर आता वरुण चक्रवर्तीवर निवृत्तीची वेळ आली आहे. हा गोलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर पिछाडीवर गेल्याचं दिसत आहे.
7 वेगवेगळ्या पद्धतीनं गोलंदाजी करता येत असल्याचा दावा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीने केला आहे. त्याने 6 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. तर 31 आयपीएलच्या सामन्यात 36 विकेट्स घेण्यात त्याला यश आलं आहे.
वरुण चक्रवर्ती तमिळनाडूकडून खेळणारा स्पिनर आहे. त्याचा जन्म 29 ऑगस्ट 1991 रोजी कर्नाटकातील एक मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. वरूणने शालेय शिक्षण पूर्ण करता करता क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षापासून विकेटकीपिंग आणि फलंदाजीची आवड निर्माण झाली. अनेकदा त्याला एज ग्रूपमुळे रिजेक्शनचा सामना करावा लागला.
वरूण चक्रवर्तीने पुढे आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आर्किटेक्स सेक्टरमध्ये नोकरीही केली मात्र क्रिकेट ही आवड शांत बसू देत नव्हती. त्याचं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न त्याने पूर्ण करायचं ठरवलं. त्याने नोकरीवरून लक्ष हटवलं आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. 2015 मध्ये त्याने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
सुरुवातीलाच त्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. गुडघ्याच्या दुखण्यामुळे काही काळ मैदानापासून दूर राहावं लागलं. त्यानंतर पुन्हा ट्रेनिंगला जेव्हा सुरुवात केली तेव्हा बॉलिंगमधील व्हेरिएशन त्याने अवगत केले. 7 वेगवेगळ्या प्रकारे बॉल टाकून तो फलंदाजाला बाचकवायचा आणि त्यानंतर आऊट करायचा.
2017-18 मध्ये चेन्नई संघाकडून वरुणला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याने 7 सामन्यात 31 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
आयपीएल 2019 मध्ये वरुणला आपल्या संघात घेण्यासाठी चुरस लागली. पंजाब इलेव्हन संघाने त्याला आपल्या संघात घेतलं. त्यावेळी त्याची खूप चर्चाही होती. 8.4 कोटी रुपये देऊन पंजाब संघाने त्याला घेतलं होतं. मात्र त्याला खेळण्याची संधी जास्त मिळाली नाही. कोलकाता संघाने 4 कोटी रुपये देऊन त्याला आपल्या संघात घेतलं. 2022 मध्ये वरुणला आयपीएलमध्ये कोलकाता संघाने कायम ठेवलं आहे.
टी 20 वर्ल्ड कप हा वरूण चक्रवर्तीसाठी फार भयंकर ठरला. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने ग्रूपमधून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर वरुणला खेळण्याचीही संधी मिळाली नाही. वरुण नकळत टीम इंडियासाठी व्हिलन बनला. जे व्हाययला नको तेच झालं.
गेल्या काही महिन्यांमध्ये वरुणला कुठेच संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता वरुण चक्रवर्ती संन्यास घेणार की नाही याबाबत चर्चा आहे मात्र त्याने कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.