FIFA World Cup 2022 : Lionel Messi आणि Ronaldo यांचा `तो` फोटो एडिटेड? पाहा काय आहे सत्य!
या फोटोमध्ये मेस्सी आणि रोनाल्डो बुद्धीबळ खेळताना दिसत होते. हा फोटो पाहिल्यानंतर दोन्ही खेळाडूंचे चाहते आनंदी झाले होते. मात्र आता या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलंय.
FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकप फिफाला (FIFA World Cup 2022) कालपासून म्हणजेच रविवारपासून सुरुवात झाली आहे. या वर्ल्डकपमध्ये एकूण 32 देशांचा सहभाग आहे. तर वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी फुटबॉलचे (Football) दोन दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (Ronaldo) यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मेस्सी आणि रोनाल्डो बुद्धीबळ खेळताना दिसत होते. हा फोटो पाहिल्यानंतर दोन्ही खेळाडूंचे चाहते आनंदी झाले होते. मात्र आता या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलंय.
लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोघांनीही हा फोटो आपापल्या सोशल मीडियावरून हा फोटो शेअर केला होता. मात्र आता या फोटोचा मेकिंग व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीयोच्या माध्यमातून या फोटोवेळी मेस्सी आणि रोनाल्डो सोबत नसल्याचं समोर आलंय. हा मेकिंग व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
अमेरिकन फोटोग्राफर Annie Leibovitz यांनी हे शूट केलंय. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी behind-the-scenes footage सोशल मीडियावर पोस्ट केलं. हे पाहिल्यानंतर हा फोटो एडिटेड असल्याचं लक्षात येतंय.
यंदाचा सुरु असलेला फिफा वर्ल्डकप हा दोन्ही दिग्गज खेळाडूंचा पाचवा वर्ल्डकप आहे. कदाचित हा वर्ल्डकप दोघांचाही शेवटचा वर्ल्डकप असल्याचं मानलं जातंय.
या शूटदरम्यान लिओनेल मेस्सी म्हणाला, हा माझ्यासाठी पाचवा वर्ल्डकप आहे. त्यामुळे ही ट्रॉफी माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
तर यावेळी रोनाल्डो म्हणाला की, विजयाचा अर्थ माझ्यासाठी हा योग्य पिता बनणं आहे. सर्वात लक्षात राहणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे जेव्हा मी माझ्या राष्ट्रीय टीमसाठी पहिली ट्रॉफी जिंकली होती.