Lionel Messi ने जग जिंकलं पण... स्वत:च्या मुलाबरोबर असं का वागला? Video होतोय व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ असा व्हायरल झालाय, जे पाहून मेस्सीचे चाहते काहीसे भावूक होणार आहे. कदाचित काहींना मेस्सीचं असं वागणं पटणार देखील नाही.
Lionel Messi ignore ciro : फिफाचा (Fifa world cup) फिवर अजूनही फुटबॉल प्रेमींमधून काही जात नाही. फुटबॉलचा स्टार लिओनेल मेस्सीचे (Lionel Messi) फॅन तर अजूनही आनंद व्यक्त करतायत. 36 वर्षानंतर अर्जेंटीनाने (Argentina win world cup) वर्ल्डकप जिंकला आणि मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ अजून सोशल मीडियावर व्हायरल होतायत. हे व्हिडीओ पाहून चाहते फार आनंद घेतायत. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ असा व्हायरल झालाय, जे पाहून मेस्सीचे चाहते काहीसे भावूक होणार आहे. कदाचित काहींना मेस्सीचं असं वागणं पटणार देखील नाही.
18 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सीने पाहिलेलं इतक्या वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. या दिवशी त्याच्या हातात फुटबॉलचा वर्ल्डकप होता. सामना जिंकल्यानंतर अर्जेंटीनाच्या टीममधील खेळाडूंची फॅमिली मैदानावर आली होती. यावेळी खेळाडूंची पत्नी, पालक यांच्यासोबत मुलंही मैदानावर जिंकल्याचं सेलिब्रेशन करत होतं. कर्णधार मेस्सीचं कुटुंब म्हणजेच त्याची पत्नी आणि तीन मुलंही वडिलांसोबत मैदानावर दिसली. याचवेळी किरो मेस्सीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मेस्सीच्या लहानग्या मुलाचा भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल
लिओनेलला 3 मुलं आहेत. थियागो, मातेओ आणि किरो...सेलिब्रेशन सुरु असताना मेस्सी त्याचा दुसरा मुलगा मातेओचा मांडीवर घेऊन बसलेला दिसतोय. मातेओ यामध्ये फार खूश दिसून येतोय. त्याच्याच मागे किरो (Ciro Messi) हा शांतपणे बसला आहे. किरोकडे कोणीच बघत नसतं. आपल्याकडे लक्ष नाही म्हणून तो लिओनेलला बोलावून काहीतरी दाखवण्याचाही प्रयत्न करतो. मात्र पुन्हा काही कारणाने मेस्सी किरोकडे दुर्लक्ष करतो.
किरोचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की भावूक झाला असेल. हा व्हिडीओ पाहून, मेस्सी आपल्याच लहानग्या मुलासोबत असं का वागतोय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. मात्र शांत आणि दुर्लक्षित असलेल्या किरोकडे पाहून तुम्हालाही वाईट वाटेल.
फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीनाचा विजय
सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटीनाने थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. तर अखेरीस अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.