कार्डिफ :  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ए ग्रुपच्या सामन्यात जो रूट, हेल्स आणि जॉश बटलरच्या  शानदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडने न्यूझीलंड विरुद्ध निर्धारित ५० षटकात सर्वबाद ३१० धावा केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लडला आठव्या षटकात धावसंख्या ३७ असताना पहिला धक्का बसला. रॉय १३ धावांवर बाद झाला. त्याला मिलान याने क्लिन बोल्ड केले. 


 



त्यानंतर हेल्स याने ५२ आणि जो रूट यांनी आपआपली अर्धशतके पूर्ण केली. अर्धशतक झाल्यावर जोरात फटका मारण्याच्या नादात हेल्स क्लिनबोल्ड झाला.  त्यानंतर कर्णधार मॉर्गनने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण तो १३ धावसंख्येवर बाद झाला. इंग्लंडची धावसंख्या वेगात पुढे जात होती पण त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. 


धावसंख्या १८८ असताना मागील सामन्यातील शतकवीर जो रूट ६४ धावांवर बाद झाला. त्याला कोरी अँडरसनने क्लीनबोल्ड केले. बेन स्ट्रोकने फटकेबाजी करत ४८ धावा केल्या. पण त्याला बोल्टने झेलबाद केले.  


मोईन अली आणि राशीद यांनी बटलरला साथ देण्याचा प्रयत्न केला पण तेही प्रत्येकी १२ धावांवर बाद झाले.