Shubman Gill Ishan Kishan: हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे शुभमन गिल (Shubman Gill). त्याने उत्तम फलंजादी करत न्यूझीलंडविरूद्ध 208 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच टीम इंडियाला 12 रन्सने विजय मिळवणं शक्य झालं. दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि इशान किशनने (Ishan Kishan) शुभमनचा एक इंटरव्यू घेतला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.


डबल सेंच्युरीनंतर हिटमॅनने घेतला शुभमन गिलचा इंटरव्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमचा युवा ओपनर शुभमन गिलने न्यूझीलंडविरूद्ध खास खेळी केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशनने त्याचा मजेशीर इंटरव्यू घेतला. ज्यामध्ये रोहितने गिलला या खेळीनंतर त्याच्या भावना विचारला. 


या प्रश्नाचं उत्तर देताना गिल म्हणाला, मला फार छान वाटतंय. श्रीलंकेविरूद्ध 2 सामन्यांमध्ये मी लवकर आऊट झालेलो. या सामन्यात मला एक चांगला स्टार्ट मिळाला. त्यामुळे मी या सामन्यात एक मोठी खेळी करू शकलो.


किशनच्या प्रश्नावर रोहित शर्माने गिलला डिवचलं


दरम्यान सामन्यापूर्वी तुझं रूटीन कसं असतं, असा सवाल इशानने गिलला विचारला. या प्रश्नाचं उत्तर गिल देणार इतक्यात रोहित मध्येच म्हणाला, अरे काय असणार तुमच्या दोघांचं रूटीन, एकाच रूममध्ये राहता, एकत्र झोपता..


यानंतर शुभमन म्हणाला, "इशान मला पार त्रास देतो. टीव्हीवर मोठ्या आवाज सिनेमे पाहतो. अशावेळ मी त्याला शिव्या देऊन झोपवतो, मात्र तरीही तो मला झोपू देत नाही." 



गिलच्या या उत्तराने तिघांमध्येही एकच हशा पिकला. दरम्यान याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. 


न्यूझीलंडविरूद्ध शुभमन गिलची वादळी खेळी


पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. टीम इंडियाकडून सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubman Gill) उतरले होते. दोघांनी सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली होती. या फटकेबाजीत रोहित शर्मा 34 धावा करून आऊट झाला. मात्र मैदानात शुभमन एकाकी झुंज देत होता. 


टीम इंडियाचे एका मागोमाग एक विकेट पडत असताना शुभमन गिल (Shubman Gill Double Century) मात्र चांगल्या लयीत खेळत होता.त्याने डबल सेंच्यूरी देखील ठोकली. मात्र या सेच्यूरीनंतर तो बाद झाला. टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे.