पुणे : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी करत 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 230/9वर रोखलं आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर बुमराह आणि युझुवेंद्र चहलला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि अक्सर पटेलला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये होत असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडच्या एकाही बॅट्समनला अर्ध शतकापर्यंतही मजल मारता आली नाही. हेन्री निकोलासनं सर्वाधिक 42 रन्स बनवल्या.


लाईव्ह स्कोअर बोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा


पहिल्या मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय टीमवर दुसरी वनडे जिंकण्याचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंडने मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात सहा गडी राखून भारतावर मात केली होती आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर 4-1 ने मालिका जिंकली होती. 2016 नंतर भारताचा हा सलग सहावा मालिका विजय होता. आता मात्र भारतीय संघाने आजचा सामना गमावला तर विजयाची मालिका खंडित होईल.


पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमी शतकानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. विराटने फलंदाजांकडून अजून धावांची अपेक्षा व्यक्त केली होती. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात माघारी परतले होते. त्यामुळे संघाला चांगली सुरूवात मिळाली नव्हती. विराट वगळता एकाही फलंदाजाला चांगला स्कोअर करता आला नाही. महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, दिनेश कार्तिक यांच्याकडून आज धावांची अपेक्षा असणार आहे.