IPL 2024 GT vs CSK Live Update : गुजराजने चेन्नईला पाजलं पाणी, सीएसकेचा 35 धावांची पराभव
IPL 2024 : आयपीएलच्या 59 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने असणार आहेत. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याासाठी शुभमन गिल सज्ज झालाय.
IPL 2024 GT vs CSK : आयपीएलमध्ये आज ऋतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग्स आणि शुभमन गिलची गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना रंगणार आहे. प्ले ऑफ गाठण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला हा सामना जिंकण्याची गरज आहे. तर प्ले ऑफमधलं स्थान कायम राखण्यासाठी गुजरातचाही विजयाचा प्रयत्न असणार आहे.
Latest Updates
पराभवानंतरही चेन्नईचा संघ 12 सामन्यांत सहा विजय आणि सहा पराभवांसह 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. गुजरातचा संघ १२ सामन्यांतून पाच विजय आणि सात पराभवांसह १० गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या तीन विकेट्सच्या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले. चेन्नईकडून डॅरिल मिशेलने 63 आणि मोईन अलीने 56 धावा केल्या.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे चेन्नईचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावाच करू शकला.
अखेरच्या ओव्हरमध्ये धोनीचा पॉवर शो पहायला मिळतोय. धोनीने राशीदला दोन सिक्स मारले अन् 1 फोर मारला.
आक्रमक प्रदर्शन करणारा मोईन अलीची विकेट मोहित शर्माने काढली अन् गुजरातने सुटकेचा श्वास घेतलाय. मोईन अलीने 56 धावांची खेळी केलीये.
चेन्नईची सुरूवात खराब झाली आहे. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड देखील शुन्यावर बाद झाला.
चेन्नईला दुहेरी झटका बसला आहे. चेन्नईचे दोन्ही सलामीवर पहिल्याच ओव्हरमध्ये तंबूत परतले. सीएसकेने रचिन रविंद्र आणि अजिंक्य रहाणेला मैदाना पाठवून सर्वांना धक्का दिला होता. मात्र, गुजरातने दोघांना तंबूत पाठवून चेन्नईला धक्का दिलाय.
IPL 2024 GT vs CSK : गुजरात टायटन्सने तुफान फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. गुजरातने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 232 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने 3 विकेट गमावत 231 धावा केल्या. सलामीला आल्या साई सुदर्शन आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटासाठी तब्बल 210 धावांची भागिदारी केली. साई सुदर्शन 103 धावांवर बाद झाला. त्याने 51 चेंडूत 7 षटकार आणि 5 चौकार लगावले. तर कर्णधार शुभमन गिलने 55 चेंडूत 104 धावा केल्या. यात त्याने तब्बल 9 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली.
IPL 2024 GT vs CSK : गुजरात टायटन्सने तुफान फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. गुजरातने 210 धावांवर पहली विकेट गमावली. तुषा देशपांडेच्या गोलंदाजीवर साई सुदर्शन शिवम दुबेकडे झेल देऊन बाद झाला. सुदर्शनने 103 धावा केल्या.
IPL 2024 GT vs CSK : गुजरात टायटन्सने तुफान फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. गुजरातने बिनबाद 200 धावा केल्यात शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं. त्यापाठोपाठ साई सुदर्शननेही शानदार शतक झळकावलं.
PL 2024 GT vs CSK : गुजरात टायटन्सने तुफान फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. गुजरातने बिनबाद 200 धावा केल्यात शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं.
IPL 2024 GT vs CSK Live Update
पहिली फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केलीय. गुजरातने 13 षटकात बिनबाद 160 धावांचा टप्पा पूर्ण केलाय.
IPL 2024 GT vs CSK Live Update
पहिली फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या दहा षटकात गुजरातने एकही विकेट न गमावता 100 धावांचा टप्पा गाठला आहे. साई सुदर्सनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर शुभमन गिलनेही षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केलंय.
IPL 2024 GT vs CSK Live Update :
आयपीएलच्या 59 व्या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या गुजरातने दमदार सुरुवात केली आहे. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या साई सुदर्शन आणि शुभमन गिलने फटकेबाजी करत चार षटकात 40 धावांचा टप्पा पार केलाय.