PBKS vs SRH : रोमांचक सामन्यात हैदराबादचा दणदणीत विजय, पंजाबवर फक्त 2 धावांनी विजय

Saurabh Talekar Tue, 09 Apr 2024-11:19 pm,

IPL 2024, PBKS vs SRH Live score : सनरायझर्स आणि पंजाब या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामन्यांत दोन विजय नोंदवले आहेत आणि दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा ठरेल.

Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live score : आयपीएल 2024 च्या 23व्या सामन्यात पंजाब किंग्जचा आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. 


 

Latest Updates

  • सनरायझर्स हैदराबादने, पंजाब किंग्सविरूद्ध अत्यंत जवळच्या सामन्यात 2 धावांनी विजय प्राप्त केला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने शशांक सिंग आणि आशुतोष शर्मासमोर 29 धावा डिफेन्ड केल्या आणि हैदराबादला पॉइंट्स टेबलमध्ये 2 गुण प्राप्त करून दिलेय.

  • नीतीश रेड्डीने 16 व्या ओव्हरमध्ये पंजाबच्या जितेश शर्माची विकेट घेतली आहे. जितेश हा 19 धावा बनवुन आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर पंजाबचा आणखी एक दमदार फलंदाज आशुतोष शर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे. 

  • 15 ओव्हरनंतर पंजाबला 30 बॉलमध्ये 75 रन्स लागत आहे. जितेश शर्मा हा 11 वर खेळतोय तर इन फॉर्म शशांक सिंगने एक बाजू सांभाळून ठेवली आहे शशांक हा 18 वर खेळत आहे आणि पंजाबचा स्कोर 105-5 असा आहे.

  • स्ट्रॅटेजिक टाइम आउटनंतर लगेचच जयदेव उनाडकटने 14 व्या ओव्हरमध्ये सेट दिसत असलेल्या सिकंदर रझा 28 च्या स्कोरवर कॅच आउट झाला आहे. 5 व्या विकेटनंतर जितेश शर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • नटराजनच्या 10 व्या ओव्हरमध्ये पंजाबला धोका बनत असणारा सॅम करन हा 29 धावांची ताबडतोब इनिंग खेळून बाद झाला आहे. 10 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोर आहे 66-4

  • भूवनेश्वर कुमारच्या पाचव्या ओव्हरमध्ये पंजाबला मोठा धक्का बसलाय, पंजाबचा कॅप्टन शिखर धवन हा भूवनेश्वरच्या बॉलिंगवर 14 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पंजाब किंग्स 20-3

  • तिसऱ्या ओव्हरमध्ये भूवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंग हा केवळ 4 धावा करून बाद झाला आहे. पंजाबच्या दुसऱ्या विकेटनंतर सॅम करन हा फलंदाजीसाठी  मैदानात आला आहे.

  • हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिंस याने पंजाबचा धाकड फलंदाज जॉनी बेयरस्टो याला शून्यावर क्लिन बोल्ड केलं आहे. पहिल्या विकेटनंतर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून प्रभसिमरन सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 20 ओव्हरच्या समाप्तीनंतर सनरायझर्स हैदराबादने, पंजाब किंग्सला 183 धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबाकडून फक्त एकमात्र फलंदाजाने अर्धशतक केलं आहे. आंध्र प्रदेशाचा युवा खेळाडू नीतीश कुमार रेड्डी याने 37 बॉलमध्ये 64 धावांची उपायकारक खेळी खेळून एसआरएचला या धावसंख्येपर्यंच पोहोचवलं आहे. पंजाबकडून गोलंदाजीत अर्शदीपने उत्कृष्ट प्रदर्शन करत 4 विकेट घेतल्या आहेत, तर करन आणि हर्षलने 2 विकेट घेतल्या आहेत आणि एक विकेट ही रबाडाच्या खात्यात गेली आहे.

    तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आज हैदराबाद आपला तिसरा विजय नोंदवते की पंजाब?

  • 18 व्या ओव्हरमध्ये कगिसो रबाडाच्या ओव्हरमध्ये हैदराबदचा कॅप्टन पॅट कमिंस याला क्लिन बोल्ड केलं आहे. हैदराबादची स्थिती प्रत्येक विकेटनं आणखी वाईट होते आहे.

  • अर्शदीप सिंगने 17 व्या ओव्हरमध्ये परत एकदा एकाच ओव्हरमध्ये दोन सेट फलंदाजांची विकेट झटकून हैदराबादची स्थिती खराब केली आहे. अब्दूल समद आणि नीतीश रेड्डी या दोघांनी 17 व्या ओव्हरमध्ये आपली विकेट गमावली आहे.

  • 15 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोर 133-5 असा आहे. नीतीश रेड्डी याने 32 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. हरप्रीत ब्रारच्या 15 व्या ओव्हरीत नीतीशने 22 धावा काढल्या आहेत.

  • 14 व्या ओव्हरमध्ये हैदराबादचा धाकड फलंदाज हेनरिक क्लासेन हा अर्शदिपच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. क्लासेनच्या विकेटनंतर अब्दुल समद हा फलंदाजीसाठी आला आहे. 

  • 14 व्या ओव्हरमध्ये हैदराबादचा धाकड फलंदाज हेनरिक क्लासेन हा अर्शदिपच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. क्लासेनच्या विकेटनंतर अब्दुल समद हा फलंदाजीसाठी आला आहे. 

  • 10 ओव्हर अखेरीस हैदराबादचा स्कोर 66-4 असा आहे. राहूल त्रिपाठी हा बाद पंजाबच्या हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. चौथ्या विकेटनंतर धडाकेबाज फलंदाज क्लासेन हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 5 व्या ओव्हरनंतर पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांची कंबर मोडली आहे. पाचव्या ओव्हरीत अभिषेक शर्मासुद्धा बाद झाला आहे. तर पाचव्या ओव्हरनंतर हैदराबादची स्थिती 39-3 अशी आहे.

  • अर्शदिप सिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादने ट्रॅविस हेड आणि एढण मारक्रम या दोघं धाकड फलंदाजांची विकेट गमावली आहे. 

  • PBKS VS SRH : पंजाबचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PBKS प्लेइंग 11 -

    शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (W), आशुतोष शर्मा, सॅम करन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

    SRH प्लेइंग 11 -

    ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

  • हेड टू हेड

    पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांचा पाचवा सामना असणार आहे. आयपीएलमध्ये पीबीकेएस आणि एसआरएच यांच्यात आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पंजाबने 7 सामने जिंकले आणि हैदराबादने 14 सामने जिंकले. तर आतापर्यंत पंजाबने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 211 धावांची मजल मारली आहे. तर त्याचवेळी पंजाबने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 212 धावांची खेळी केली होती. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link