RCB vs CSK: चेन्नईच्या आव्हानासमोर आरसीबीने टाकली नांगी; थरारक सामन्यात CSK चा दमदार विजय!

Mon, 17 Apr 2023-11:24 pm,

RCB vs CSK, IPL 2023 : आयपीएल (IPL 2023) हंमागातील सर्वात रोमांचक सामना आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नईने बंगळुरूच्या विराटसेनेवर विजय मिळवला आहे.

IPL 2023 RCB vs CSK LIVE: आयपीएलचा 24 वा सामना आयपीएलच्या दोन सर्वात लोकप्रिय संघांमध्ये खेळला गेला. एका बाजूला चेन्नई सुपर किंग्ज आणि दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ. सामना एवढा रंगला की, उत्सुकता वेगळ्याच थरावर गेली होती. अखेरच्या ओव्हरवर 19 धावांवर असताना माथेशा पाथीराणा (Matheesha Pathirana) याने शानदार ओव्हर केली आणि सामना चेन्नईच्या पारड्यात गेला.

Latest Updates

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला मोठा धक्का कर्णधार फाफ डू प्लेसिस आऊट, मोईन अलीच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला बसला मोठा धक्का, तुफान फलंदाजी करत ग्लेन मॅक्सवेलने महिश थिकशानाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score :ग्लेन मॅक्सवेलचं अर्धशतक पूर्ण, फक्त 24 बॉल्समध्ये पूर्ण केलं अर्धशतक 

     

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score :  एफ डू प्लेसिसची तुफानी फलंदाजी फक्त 23 बॉल्समध्ये ठोकलं अर्धशतक 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला बसला दुसरा धक्का, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर महिपाल लोमरोर आऊट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला बसला पहिला मोठा धक्का, विराट कोहली आकाश सिंगच्या गोलंदाजीवर बाद 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score : चेन्नईला बसला चौथा धक्का, शिवम दुबे बाद, पारनेलच्या गोलंदाजीवर सिराजचा उत्तम कॅच 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score : शिवम दुबेची दमदार फलंदाजी, फक्त 25 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score : डेव्हॉन कॉनवे आऊट, चेन्नईला तिसरा धक्का, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score चेन्नईचे 100 रन्स पूर्ण, गमावल्या 2 विकेट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईला दुसरा मोठा धक्का, अजिंक्य रहाणे बाद, वहिनंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईची पॉवरप्लेमध्ये 53 धावांची खेळी, 1 विकेटचं नुकसान 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score: 5 ओव्हरमध्ये चेन्नईची 38 धावांची खेळी, गमावली 1 विकेट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईच्या फलंदाजीला सुरवात, ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे क्रिझवर, बंगळुरूकडून मोहम्मद सिराज करणार पहिली गोलंदाजी 

     

  • दोन्ही टीम्सची प्लेइंग 11

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, शिवम दुबे,महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), तुषार देशपांडे, महिश थिकशाना,मथीशा पथिराना

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : एफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, वहिनंदू हसरंगा, शाहबाज अहमद, डब्ल्यूडी पारनेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाख

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link