महिन्याला ७३ कोटी रुपये कमवणाऱ्या खेळाडूची गरीबी तुम्ही पाहिलीय... स्क्रीन तुटलेला आयफोन, ते फाटलेले शूज
तुम्ही कोणत्याही खेळाडूला, शक्यतो फुटबॉल खेळाडूला महागड्या कार, शूज किंवा मोबाईल वापरताना पाहिले असणार.
मुंबई : तुम्ही कोणत्याही खेळाडूला, शक्यतो फुटबॉल खेळाडूला महागड्या कार, शूज किंवा मोबाईल वापरताना पाहिले असणार. परंतु तुटलेला फोन आणि फाटलेले शूज घातलेल्या खेळाडूला तुम्ही कधी पाहिलयं का? पंरतु आज आम्ही तुम्हाला अशा फुटबॉल खेळाडूविषयी सांगणार आहेत. ज्याची महिन्याची क्लबमधील कमाई सुमारे 73 कोटी रुपये आहे. इंग्लंडचा प्रतिष्ठित फुटबॉल क्लब लिव्हरपूलचा स्टार विंगर सादिओ माने यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये तुटलेला फोन आणि फाटलेल्या बुटाचे फोटो आहेत. तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही की, जगातील सगळ्या नामांकीत आणि सर्वाधिक पैसे कमावणार खेळाडू अशा वस्तू वापरतो.
त्याच्या चाहात्यांना हा फोटो पाहून प्रश्न पडला आहे की, तो हा जुना फोन का बदलत नाही? तर काहींनी त्याची खिल्लीही उडविली की, तू जर नवीन फोन विकत घेऊ शकत नसशील, तर त्याला स्क्रीनगार्ड तरी नवीन बसव. त्यावर सादिओ माने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे उत्तर जाणून घेतल्यावर तुम्हाला खरोखर धक्का बसेल आणि कदाचित तुम्ही त्याला देव माणूस समजाल.
त्याला माहित आहे, गरीबी वाईट असते
कारण तो त्याच्या फोनपेक्षा जास्त आपल्या देशातील गरिबांकडे अधिक लक्ष देतो. त्याला माहित आहे, गरीबी वाईट असते, म्हणून तो त्यांना त्याच्या कामाईमधून मदत करतो. त्यामुळे तो त्याच्या देशातील लोकांसाठी तरी, देव माणूस आहे.
मी गरीबी पाहिली आहे. मला शाळेत जाता आले नाही...
तो नवीन फोन का घेत नाही, यावर देखील त्याने लोकांना सांगितले की, "मी याप्रमाणे हजारो फोन विकत घेऊ शकतो. परंतु मला 10 फेरारीस, 2 जेट विमाने आणि 20 डायमंड घड्याळांची खरंच गरज आहे का? मला या सगळ्याची काय आवश्यकता आहे? मी गरीबी पाहिली आहे. मला शाळेत जाता आले नाही.
हेच कारण आहे की, मी माझ्या देशात शाळा बांधल्या, ज्यामुळे माझ्या देशातील मुलांना अभ्यास करणे शक्य होईल. त्याच बरोबर मी फुटबॉल स्टेडियम देखील तयार केले आहे. ज्याचा येथील मुलांना फायदा होईल."
भूक लागली की, तो माती खाऊन आपल्या पोटाची भूक भगवायचा
सादिओ माने याच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल जर तुम्ही ऐकलेत तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कष्ट कदाचित कमी वाटतील, कारण सादिओ मानेची घरची परिस्थिती इतकी वाईट होती की, त्याला खायला देखील अन्न नव्हते. त्याला भूक लागली की, तो माती खाऊन आपल्या पोटाची भूक भगवायचा. या एका घटनेवरून तुम्हाला लक्षात येईल, तो इतका नम्र आणि साधे आयुष्य का जगत आहे ते.
तुम्ही जर त्याचे शूज पाहिलात तर तुम्हाला वाटेल की, या शूजने तर कोणी धड चालू ही शकणार नाही, पंरतु सादिओ मानेने मात्र या शुजने फुटबॉलच्या करिअरची सुरवात केली.
तर चांगल्या शूजची अपेक्षा कशी करणार?
सगळ्यांना आपल्या क्लबमध्ये हवा हवासा वाटणाऱ्या या खेळाडूकडे खायलाच काही नव्हते, तर चांगल्या शूजची अपेक्षा कशी करणार? तो त्याच्या आयुष्याची पहिली मॅच खेळायला मैलो लांब धावत पोहचला.
गाडीचे पैसे नाहीत आणि फाटलेले शूज
गाडीचे पैसे नसल्यामुळे फाटलेले शूज घालून मैलो लांब असलेल्या स्टेडियमवर सादिओ माने पोहचला. तेथे त्याला पाहिल्यावर कोच त्याला म्हणाला, 'तुझं इथे काम होणे शक्य नाही. 5 मिनिटं आजूबाजूला नजर फिरव तुला समजेल बाकीचे किती तयारी करुन आले आहेत ते'.
त्यावर सादिओ माने म्हणाला, 'मला 5 मिनिटं खेळायला द्या तुम्हाला समजेल की, माझी किती तयारी आहे ते' आणि खरोखरच 5 मिनिटांच्या आत त्या कोचला सादिओ मानेचं बोलण पटलं आणि ज्यानंतर सादिओ मानेचं आयुष्य पूर्णपणे बदलंल.