Lockie Ferguson NZ vs PNG: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 39 वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनिआ (NZ vs PNG) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनिआचा 7 गडी राखून पराभव केलाय. पापुआ न्यू गिनिआने 19.4 ओव्हरमध्ये 78 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडने 12.2 ओव्हरमध्येच खेळ खल्लास केला. न्यूझीलंडसाठी विजयाचा हिरो ठरला लॉकी फर्ग्युसन...! लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रेकॉर्ड रचलाय. 


Lockie Ferguson ने रचला रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका गोलंदाजांना 4 ओव्हर देण्यात येतात. लॉकी फर्ग्युसनने पापुआ न्यू गिनिआविरुजद्ध 4 ओव्हर केल्या अन् या संपूर्ण स्पेलमध्ये त्याने एकही धाव दिली नाही. लॉकीने 4 ओव्हरमधील सर्व ओव्हर मेडन टाकल्या अन् तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. लॉकीने चौथी, सहावी, बारावी आणि चौदावी ओव्हर टाकली.


जगातील दुसरा गोलंदाज


टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजाने एका डावात चार मेडन्स टाकल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी, 2021 मध्ये पनामाविरुद्ध फक्त कॅनडाच्या साद बिन जफरने ही कामगिरी केली आहे. अशातच आता लॉकी फर्ग्युसन जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.


काय म्हणाला Lockie Ferguson?


आम्ही चांगली गोलंदाजी केली आहे आणि संघावर दबाव आणला. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध माघार घेणं आम्हाला महागात पडलं पण हा खेळ आहे आणि आम्हाला पुन्हा परतणं आवश्यक आहे. खूप अटीतटीची लढत होती. फलंदाजांसाठी विकेट खूप मदतीची नव्हती, याचा फायदा झाला. आता आम्हाला मायदेशी परतावं लागतंय, पण शेवटी हा खेळ आहे, असंही लॉकी फर्ग्युसनने म्हटलं आहे.


न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: केन विल्यमसन (कॅप्टन), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.


पापुआ न्यू गिनी प्लेइंग इलेव्हन: असद वाला (कॅप्टन), टोनी उरा, चार्ल्स अमिनी, सेसे बाऊ, हिरी हिरी, चाड सोपर, किपलिन डोरिगा (विकेटकीपर), नॉर्मन वानुआ, अले नाओ, काबुआ मोरिया आणि सेमो कामिया.