बंगळुरू : कर्नाटक विधानसभेचा सदिच्छादूत असलेला माजी क्रिकेटर राहुल द्रविड लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही. द्रविडचा पत्ता बदल्यानंतर द्रविडचं मतदारांच्या यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. द्रविड नवा पत्ता असल्याचा अर्ज परदेशात असल्यामुळे निर्धारित कालावधीत दाखल करु शकला नसल्यामुळे, त्याचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक अधिकारी तीनवेळा त्याच्या नव्या पत्त्यावर पडताळणीसाठी गेले असता तिन्ही वेळेस द्रविड परदेशात होता. दरम्यान पत्ता बदलला असल्यामुळे जुन्या मतदार संघातील मतदारांच्या यादीतून राहुलचं नाव वगळण्यात यावं, असा अर्ज त्याच्या भावानं दाखल केला होता. द्रविड पूर्व बंगळुरूमधील इंदीरा नगरमध्ये राहत असे. आता तो मल्लेश्वरम इथे राहायला गेला आहे.