मुंबई : क्रिकेट विश्वात प्रत्येक पिढीतील खेळाडूंनी अनेक विक्रम केले आहेत. काही क्रिकेटपटू असे आहेत, जे आपल्याला कायम लक्षात राहतील. पण एक क्रिकेटर असाही आहे ज्याने क्रिकेट विश्वात अशक्य असा कारनामा करुन ठेवलाय. पण त्या खेळाडूबाबत फार क्वचित क्रिकेट चाहत्यांनाच माहिती आहे. त्या क्रिकेटरचं नाव आहे (albert trott) अल्बर्ट ट्रॉट. (longest six in cricket history shahid afridi albert trott yuvraj singh mahendrasingh dhoni) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हे अल्बर्ट ट्रॉट कोण, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर अल्बर्ट ट्रॉट हे क्रिकेट विश्वातील सिक्सर किंग  (longest six in cricket history) आहेत. अल्बर्ट ट्रॉट यांच्यासमोर युवराज, गेल, धोनी आणि आफ्रिदीही सिक्स लगावण्याबाबत फिके पडतील. 


क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब सिक्स मारण्याचा रेकॉर्ड हा आफ्रिदीच्या नावावर असल्याचं म्हटलं जातं. मात्र अल्बर्ट ट्रॉट यांनीही लांब आणि खणखणीत सिक्स खेचला आहे. अल्बर्ट ट्रॉट हे क्रिकेटमधील 'सिक्सर किंग' आहेत. 


ट्रॉट हे 19व्या शतकातील धोकादायक बॅट्समनपैकी एक होते. ट्रॉट यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचं प्रतिनिधित्व केलं आहे. क्रिकेट विश्वात सर्वाधिक लांब सिक्स मारण्याचा मान हा ट्रॉट यांच्या नावावर आहे. ट्रॉटने 164 मीटर लांब सिक्स मारण्याचा पराक्रम केला आहे. 
   
शाहिद आफ्रिदी 


आफ्रिदी सर्वाधिक लांब सिक्स मारण्याच्याबाबतीत आघाडीवर आहे. आफ्रिदीने इंग्लंड विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर 158 मीटर लांब खणखणीत सिक्स हाणला होता.  


तर गगनचुंबी सिक्स मारण्याच्या बाबतीत टीम इंडियाच्या 2 फलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी समावेश आहे. युवराजने 119 मीटर लांब सिक्स खेचला आहे. विशेष म्हणजे युवराजच्या नावावर एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे. तर  धोनीनेही 112 मीटर लांबीचा सिक्स मारला आहे.