MS Dhoni च्या टीमला पराभूत करण्यासाठी लखनऊ टीममध्ये मोठा बदल?
CSK ला पराभूत करण्यासाठी के एल राहुलचा मास्टरप्लॅन, या धडाकेबाज खेळाडूला देणार संधी
मुंबई : चेन्नई टीमचा आज दुसरा सामना होणार आहे. लखनऊ विरुद्ध चेन्नई आज सामना होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी के एल राहुलने कंबर कसली आहे. एम एस धोनीच्या टीमला पराभूत करण्यासाठी नवा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.
चेन्नईचं कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे आहे. तर लखनऊचं कर्णधारपद के एल राहुलकडे आहे. गेल्या सामन्यात के एल राहुल पूर्ण फ्लॉप ठरला. क्विटन डि कॉकचीही विशेष कामगिरी नव्हती. दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीनं मॅच रुळावर आणली मात्र तरीही लखनऊ संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात लखनऊ टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. मार्कस स्टोइनिस आणि जेसन होल्डर दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. दुखापतीमुळे मार्क वुड देखील सध्या बाहेर आहे.
लखनऊ टीममध्ये एंड्रयू टाय मार्क वुडची जागा घेऊ शकतो. मोहसिन खानला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागू शकतं. चेन्नई विरुद्ध हा सामना लखनऊ टीमला जिंकणं भाग आहे.
लखनऊ संघ संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), इविन लुइस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मनीष पांडे, मोहसिन खान/एंड्रयू टाय, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवि बिश्नोई