मुंबई : टीम इंडियानंतर आता आयपीएलमध्येही वारंवार फ्लॉप शो करणाऱ्या खेळाडूचा पत्ता टीमच्या प्लेइंग इलेव्हनमधून कट करण्यात आला आहे. अजिंक्य रहाणे आणि पुजारानंतर हा खेळाडू वारंवार फ्लॉप ठरत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे टीमला अनेक अडचणी येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळाडूला सुधारण्याची संधी होती मात्र त्याने ही संधी देखील घालवली. आयपीएलमध्ये देखील त्याचा फ्लॉप शो कायम राहिल्याने अखेर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ कर्णधारावर आली. 


खराब कामगिरीमुळे दिल्ली विरुद्ध सामन्यात लखनऊ टीमचा कर्णधार के एल राहुलने मनीष पांडेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं. मनीष पांडेला याआधी 3 सामने खेळण्याची संधी देण्यात आली मात्र त्याने तिन्ही सामने मिळून जेमतेम 22 धावा केल्या होत्या. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला. 


मनीष पांडेने आयपीएल 2022 मध्ये लखनौच्या संघासाठी अत्यंत खराब कामगिरी केली. पंधराव्या हंगामात आतापर्यंत मनीष पांडेने लखनऊ टीमकडू खेळत 3 सामन्यांत 6, 5 आणि 11 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे या फलंदाजाला तीन डावात केवळ 22 धावा करता आल्या. याआधी मनीष पांडे गेल्या मोसमापर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. तिथेही फ्लॉप ठरल्याने त्याला टीममधून बाहेर बसवण्यात आलं. 


आयपीएलच्या 15 व्या हंगामात दिल्ली विरुद्ध लखनऊने विकेट्सने विजय मिळवला. लखनऊने  या सामन्यात लखनऊन टीमने 6 विकेट्सने 155 धावा करून दिल्ली टीमवर विजय मिळवला. 4 सामन्यांमध्ये लखनऊचा हा तिसरा विजय आहे. लखनऊ टीम खूप चांगली कामगिरी करत आहे.