मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी विजय मिळवला आहे. लखनऊने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये  8 विकेट्स गमावून 132 धावाच करता आल्या. या पराभवासह मुंबईचा या मोसमातील सलग आठवा पराभव ठरला. तर लखनऊने विजयासह प्लेऑफच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं आहे. (lsg vs mi ipl 2022 lucknow super giants win by 36 runs mumbai indians conscutive 8th loss in 15th season)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्माने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने 38 धावांचं योगदान दिलं. मात्र इतर फलंदाजांनी नेहमीप्रमाणे निराशा केली आणि मुंबईचा आठवा पराभव झाला. 


लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खान, जेसन होल्डर, रवी बिश्नोई आमि आयुष बदोनी या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.  


त्याआधी मुंबईने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केएलच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने मुंबईला 169 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या.


केएल व्यतिरिक्त लखनऊकडून इतर कोणाला विशेष काही करता आलं नाही. मनिष पांडेने 22 धावा केल्या. आयुष बदोनीने 14 धावांचं योगदान दिलं. दीपक हुड्डा आणि क्विंटन डी कॉक या दोघांनी प्रत्येकी 10 धावा केल्या.


मुंबईकडून कायरन पोलार्ड आणि रिले मेरेडिथने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि डॅनिअल सॅम्सने 1-1 विकेट घेतली.


लखनऊ प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, मार्कस स्टोयनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान. 


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जयदेव उनादकट, रिले मेरेडिथ आणि जसप्रीत बुमराह.