मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 37 वा सामना लखनऊ (LSG) विरुद्ध मुंबई (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईचं होमग्राउंड वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस (Sachin Tendulkar Birthday) आहे. या निमित्ताने मुंबईला सचिनला वाढदिवसाचं डबल गिफ्ट देण्याची संधी आहे. (lsg vs mi ipl 2022 mumbai indian may be give debut chance to arjun tendulkar on father sachin tendulkar birtday)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा या मोसमातील हा आठवा सामना आहे. मुंबईने याआधीच्या सातही सामने गमावले आहेत.  मुंबई अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्यामुळे मुंबई लखनऊ विरुद्धच्या या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकते. 


टीम मॅनेजमेंट सचिनचा मुलगा अर्जून तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते. अर्जुनला संधी मिळाल्यास त्याचं आयपीएल डेब्यू ठरेल. तर मुंबईने हा सामना जिंकला तर या मोसमातील पलटणचा पहिलावहिला विजय ठरेल. 


आपल्या वाढदिवशी मुलाचं आयपीएल डेब्यू आणि टीमचं होमग्राउंडमध्ये विजय, सचिनसाठी यापेक्षा चांगलं डबल गिफ्ट काहीच असू शकत नाही. त्यामुळे मुंबई टीम या सामन्यात सचिनला सिंगल गिफ्ट देणार की डबल याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 


दोन्ही टीमची संभावित प्लेइंग इलेव्हन 


लखनऊ : केएल राहुल (कॅप्टन), क्वींटन डीकॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि रवी बिश्नोई.


मुंबई : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डेनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर आणि जसप्रीत बुमराह.