LSG vs MI : मुंबई इंडियन्सच्या `मिशन आयपीएल`ची वाट बिकट; लखनऊकडून 5 रन्सने पराभव
LSG vs MI Indian Premier League 2023: मुंबई इंडियन्सचा आजच्या सामन्यात 5 रन्सने पराभव झाला आहे. 177 रन्सचा पाठलाग करणं मुंबईच्या फलंदाजांना शक्य झालं नाही. टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनला मुंबईला विजय मिळवून देता आला नाही.
LSG vs MI Indian Premier League 2023: इकाना स्टेडियमवर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबईची टीम ( Mumbai team ) जिंकता जिंकता हरली. लखनऊने अवघ्या 5 रन्सने मुंबईचा ( Lucknow Super Giants win by 5 runs ) पराभव केला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर लखनऊच्या टीमने विजय मिळवला आहे.
लखनऊचा मुंबईवर विजय
आजच्या सामन्यात मुंबईने टॉस जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 177 रन्स केले. मुंबई इंडियन्स (LSG vs MI) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली. मात्र या सामन्यातंही रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही आणि तो 37 रन्सवर माघारी परतला. रोहितच्या रूपाने मुंबईला पहिला धक्का बसला.
इशान किशनने आज साजेशी कामगिरी केली. अवघ्या 34 बॉल्समध्ये त्याने अर्धशतक ठोकलं. यावेळी किशनने 7 फोर आणि 1 सिक्स लगावली. इशान 59 रन्सवर बाद झाला. सूर्या फलंदाजीला आल्यानंतर तो सामना जिंकवून देईल अशी अपेक्षा होती. मात्र या सामन्यात सूर्याची चमकही फिकी पडली. सूर्या चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे 7 रन्सवर बाद झाला. अखेरीस टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनला मुंबईला विजय मिळवून देता आला नाही.
लखनऊच्या फलंदाजांची कामगिरी
प्रथम फलंदाजी करताना लखनऊच सुपर जायंट्सची टीम पूर्णपणे फसलेली दिसली. दीपक हुडा आणि क्विंटन डी कॉक टीमला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. लखनऊकडून हुडाची विकेट पहिली पडली. दीपक हुडा, क्विंटन डी कॉक आणि प्रेरक मांकड बाद झाल्यानंतर कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉइनिसने डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी 59 बॉल्समध्ये 82 रन्सची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपमुळे 177 चा स्कोर उभारणं लखनऊला शक्य झालं.
दोन्ही टीम्सची प्लेईंग 11
लखनऊ सुपर जाएंट्स: क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, क्रुणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, स्वप्निल सिंह, मोहसिन खान, नवीन-उल-हक, रवि बिश्नोई
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेविड, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला