RR vs LSG: ना बॅट चालली ना बॉल; पण एका कॅचने ठरला `तो` विजयाचा हिरो!
Rajasthan Royals Beat Lucknow Super Giants: आवेश खानची (Avesh Khan) घातक बॉलिंग लखनऊच्या पथ्यावर पडली. त्याने 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेत सामना लखनऊकडे झुकवला. तर दीपक हुड्डाचा एक कॅच सामना जिंकवणारा राहिला.
RR vs LSG, IPL 2023: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) आयपीएलचा थरारक 26 वा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊने राजस्थानचा 10 रन्सने पराभव केला आहे. या सामन्यात आवेश खानची (Avesh Khan) घातक बॉलिंग लखनऊच्या पथ्यावर पडली. त्याने 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेत सामना लखनऊकडे झुकवला. तर मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) देखील 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तर फलंदाजीत मायर्सने (K Mayers) हाफ सेच्यूरी झळकावली.
सामना थरारक स्थितीत होता... राजस्थानला अंतिम दोन सामन्यात विजयासाठी 29 धावांची गरज होती. त्यावेळी नवीन उल हकने 10 धावा दिल्या. त्यावेळी घातक रियान पराग मैदानात होता. शेवटची ओव्हर, आता राजस्थानला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. मोठा स्टाईक मैदानावर असणं गरजेचं होतं. देवदत्त पेडिकल आणि रियान पराग ठाव मांडून होते.
पहिल्या बॉलवर फोर, दुसऱ्यावर सिंगल... तिसऱ्या बॉलवर पेडिकल बाद झाला. त्यानंतर चौथ्या बॉलवर 4 बॉलवर 14 धावांची गरज होती. मैदानात वेस्ट इंडिजचा रांगडा होल्डर मैदानात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, संजूने नवख्या जुवेलला मैदानात पाठवलं.
सामन्याच्या चौथ्या बॉलवर जुवेलने सिक्स खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉन्ड्री लाईवर उभ्या असलेल्या दीपक हुड्डाने (Deepak Hooda) अफलातून कॅच पकडला. सिमारेषेवर कॅच पकडल्याने हुड्डाने सिक्स तर वाचवलाच, त्याचबरोबर विकेटही मिळवून दिली.
पाहा Video -
दरम्यान, त्याच्या या कागमिरीबद्दल त्याला कॅच ऑफ द मॅचचा (Catch of the Match) पुरस्कार देखील मिळाला आहे. हुड्डाचा कॅच पाहून कॅप्टन के एल राहूलचा (KL Rahul) आनंद देखील गगनात मावला नाही. राहूलचा कधी नव्हे तो आनंद पहायला मिळाला.