मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ विरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 धावांनी जिंकला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहूलने 58 चेंडूत 79 धावा केल्या करत एक विशेष रेकॉर्ड आपल्या नावे केला. 
मात्र राहूलचा हा रेकॉर्ड आरसीबीचा पराभव करण्यात कामी आला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल ठरला पहिला बॅट्समन 


कर्णधार केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्घच्या सामन्यात 79 धावांची खेळी केली. या खेळीसह राहुलने   
आयपीएल 2022 मध्ये 600 धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या चार मोसमात ६००+ धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.  या धावसंख्येने त्याने त्याच्या नावावर आयपीएलमध्ये विशेष विक्रम नोंदवलाय. राहुलने याआधी IPL 2021 मध्ये 626 धावा, IPL 2020 मध्ये 670 धावा आणि IPL 2018 मध्ये 659 धावा केल्या होत्या. त्यामुळे आयपीएलमध्ये त्याने चार वेळा 600 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 


'या' खेळाडूंना टाकले मागे 
केएल राहुलनंतर या क्रमवारीत ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नरचा नंबर लागतो. या दोन्ही फलंदाजांनी 3-3 वेळा आयपीएलमध्ये 600+ धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने RCB च्या संघात असताना IPL 2011, 2012 आणि 2013 मध्ये 600+ धावा केल्या होत्या. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरने 2016 ते 2019 दरम्यान सनरायझर्स हैदराबादसाठी तीनदा 600+ धावा केल्या होत्या. 


आयपीएल कामगिरी 
आयपीएल 2022 मध्ये केएल राहुल जबरदस्त लयीत आहे. त्याने 15 सामन्यात 616 धावा केल्या तर 3 वेळा नाबाद राहिला आहे. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ५१.३३ होती. त्याचवेळी त्याचा स्ट्राइक रेट 135.38 होता. केएल राहुलनेही या मोसमात दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली. या मोसमात सर्वाधिक षटकार  ठोकणाऱ्या टॉप-5 खेळाडूंमध्ये तो आहे. त्याने एकूण 30 षटकार ठोकले.


एलिमिनेटर सामन्यात राहुलने 58 चेंडूत 79 धावा केल्या. एका कर्णधाराला साजेशी कामगिरी त्याने केली. मात्र  208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ फक्त 193 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे राहुलने या सामन्यात केलेला विक्रम त्याला आरसीबी विरूद्ध विजय मिळवून देऊ शकला नाही.