मुंबई : चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना नुकताच पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर चुरशीचा सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. चेन्नई टीम दुसऱ्यांना पराभूत झाली. 6 विकेट्सने लखनऊ संघाने विजय मिळवत पॉईंट टेबलवर आपलं खातं उघडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपरकिंग्सने 210 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. लखनऊ टीमने हे लक्ष्य पूर्ण केला. विजयानंतर कर्णधार के एल राहुलने खेळाडूंचं कौतुक करत विजयाचे खरे हिरो कोण आहेत ते सांगितलं. 


बिश्नोईने जबरदस्त कामगिरी केली. बॉल दवामुळे ओला झाला असला तरी त्याने चांगली कामगिरी केली. आयुष बदोनीचा तर व्हिडीओ सगळ्यांनी पाहिला. तो खूप सुंदर शॉट खेळताना पाहायला मिळालं. त्याने उत्तम पद्धतीनं फलंदाजी केली. 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू आहे. 


लिमिटेड ओव्हरमध्ये तो उत्तम कामगिरी करतो भारतासाठी लिमिटेड ओव्हर्समध्ये त्याचासारखा हिरा मिळणं खरंच भाग्याचं आहे अशा आशयाची स्तुती बोलताना के एल राहुलने केली.


के एल राहुल बोलताना म्हणाला की आम्ही एक किंवा दोन ओव्हर थांबू शकतो मात्र पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढणं लक्ष्य आहे. डी कॉकचा उत्तम फॉर्म पाहायला मिळाला. खेळाडूंच्या कामगिरीवर लखनऊचा कर्णधार के एल राहुलने भरभरून कौतुक केलं. 


लखनऊच्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात जिंकल्यानंतर के एल राहुल खूप जास्त खूश आहे. लखनऊने 211 धावा केल्या आहेत. एविनने 55 तर डी कॉकने 61 धावा केल्या. के एल राहुलने 40 धावा केल्या आयुष बदोनी 19 धावा करून नाबाद राहिला.