मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Maharashtra Housing Minister Jitendra Awhad)  यांनी टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांना टोला लगावला आहे. गावसकरांनी आजपासून काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर गावसकरांना सरकारने बीकेसीत मोक्याच्या ठिकाणी हा प्लॉट दिला होता. क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी हा प्लॉट (BKC Mhada Plot) देण्यात आला होता. मात्र आज 33 वर्षानंतरही त्या ठिकाणी कसलंही बांधकाम झालेलं नाही. हा प्लॉट आता वापराविनाच आहे. या मुद्द्यावरुन आव्हाडांनी 2 ट्विट करत गावसकरांना टोला लगावला आहे. तसेच आता प्लॉटवर पुढील 3 वर्षात बांधकाम पूर्ण करा. त्यानंतर त्याचा वापर करायला सुरु करा, असं बंधन गावसकर यांना घालून दिले आहेत. (maharashtra housing minister jitendra awhad criticized former indian cricketer sunil gavaskar over to bkc mhada plot)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटमध्ये काय म्हंटलंय?


"जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो", असं पहिलं ट्विट आव्हाडांनी केलं.



"गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा", अशा आशायचं दुसरं ट्विट आव्हाडांनी केलंय. 


गावसकरांवर बंधन 


राज्य सरकारने गावसकरांना बीकेसीत 33 वर्षांपूर्वी क्रिकेट अकादमीसाठी हा प्लॉट दिला होता. मात्र आता या प्लॉटचं बांधकाम 3 वर्षात पूर्ण करुन क्रिकेटसह फुटबॉल,  टेबल टेनिस या खेळांनाही परवानगी देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतलाय. त्यामुळे गावसकरांसमोर येत्या 3 वर्षात संपूर्ण बांधकाम पूर्ण करुन खेळांसाठी सुरु करण्याचं आव्हान असणार आहे.