पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पाचवा दिवस असून उपांत्यपूर्व फेरी संपल्या आहेत. महाराष्ट्र केसरी गटात उपांत्यपूर्व फेरीत पुणे शहराच्या अभिजित कटकेची विजयी घोडदौड सुरू असून त्यांन उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गादी गटात अक्षय शिंदे, कौतुक डाफळे, निलेश लोखंडे तर माती विभागात किरण भगत, बाळा रफिक शेख, सूरज निकम, नीमुन्ना झुजूरकेनही उपांत्यपूर्व फेरीत विजय पटकावलाय. तर, लातूरच्या सागर बिराजदारला माती विभागात परभावाचा धक्का बसलाय.


महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महिलांचा प्रदर्शनीय सामना आता दोन्ही महाराष्ट्रीयन स्पर्धकांमध्ये होणार आहे.


आळंदीची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंकिता गुंड आणि इंदापूरची राष्ट्रीय खेळाडू हर्षदा जाधव यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. 


अंकिता आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक आणि ३ वेळ जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सहभागी आहे तसेच ९ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. तर, हर्षदा जाधव मागील तीन वर्ष राष्ट्रीय स्पर्धेत २ गोल्ड, १ सिल्वर पटकावलं, ग्रामीण राष्ट्रीय स्पर्धेत एक गोल्ड पटकावलंय.


हरियाणाची ममता ही सामना खेळू शकणार नाही. धुक्यामुळे तिची एक्सप्रेस तबवल १३ तास उशिराने धावत असल्यानं तिला सहभाग रद्द करावा लागलाय.



महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार