पुणे : कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने ६० किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. नितीन म्हात्रेने आपल्या 'भारत श्री' गटविजेतेपदाची हॅटट्रीक केली आहे.


पहिलं सुवर्ण पदक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीनच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने ११व्या 'भारत श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले.



रेल्वेची सुवर्ण गाडी सुसाट


यासोबतच ५५, ६५ आणि ७० किलो वजनी गटात रेल्वेच्या जे. जे. चकवर्ती, एस. भास्करन आणि अनास हुसेन यांनी बाजी मारून रेल्वेची सुवर्ण गाडी सुसाट असल्याचे दाखवून दिली. तसेच ९० खेळाडूंचा सहभाग असलेल्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात महाराष्ट्राच्या किरण साठे आणि रोहन पाटणकरला धक्का देत चंदीगडच्या चेतन सैनीने धमाकेदार यश संपादले.


काल प्राथमिक फेरीत अप्रतिम तयारीत असलेल्या खेळाडूंना पाहिल्यानंतर आज अंतिम फेरीत गटविजेतेपदाची निवड करताना जजेसचे कौशल्यपणाला लागले. त्यांना प्रत्येक गटात खेळाडूंची कंपेरिजन करावी लागली आणि त्यानंतरच गटविजेतेपदाचा निकाल लावण्यात आला.


महाराष्ट्राच्या स्वप्नांमध्ये अडथळे


'भारत श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेच्या पहिल्या चार गटात रेल्वेने जबरदस्त कामगिरीची नोंद करीत महाराष्ट्राच्या सांघिक विजेतेपदाच्या स्वप्नांमध्ये अडथळे निर्माण केले आहे. ५५ किलो वजनी गटात रेल्वेच्या जे. जे. चक्रवर्तीने दिल्लीच्या सोनूला मागे टाकत सोने जिंकले. त्यानंतर ६० किलो वजनी गटातही रेल्वेच्याच हरीबाबूचा बोलबाला होता, पण महाराष्ट्राच्या होल्ड मॅन नितीन म्हात्रेने आपल्या अनुभवी, पीळदार आणि सहजगत्या पोझ मारण्याच्या कलेच्या जोरावर बाजी मारली. 



सुवर्णाला गवसणी


६५ किलो गटात अनिल गोचीकरला अनपेक्षित धक्का देत एस. भास्करनने रेल्वेला आणखी एक सुवर्ण जिंकून दिले. ७० किलो वजनी गटातही रेल्वेच्या अनास हुसेनने करामत करून दाखविली. त्याने पंजाब पोलीसांच्या माजी मि. वर्ल्ड हिरालालला नमवत सुवर्णाला गवसणी घातली.


९० खेळाडूंचा विक्रमी सहभाग असलेल्या पुरूषांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात महाराष्ट्राच्या किरण साठे आणि रोहन पाटणकरपेक्षा वरचढ फिजीक फिटनेस प्रदर्शन करणाऱ्या चंदीगडच्या चेतन सैनीने सर्वांना थक्क करत सुवर्ण जिंकण्याची करामत करून दाखविली. या गटातून प्राथमिक फेरीतून तब्बल ३० खेळाडूंची निवड करण्यात आली होती आणि आज त्यातून आधी १५ आणि नंतर ५ खेळाडूंची निवड करीत अंतिम फेरीचा चित्तथरारक निकाल जाहीर करण्यात आला.


'भारत श्री 2018' राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल


पुरूष शरीरसौष्ठव


५५ किलो वजनी गट : 


१) जे.जे. चकवर्ती (रेल्वे)
२) सोनू (दिल्ली)
३) पुंदनकुमार गोपे (रेल्वे)
४) एल. नेता सिंग (मणिपूर)
५) व्ही. आरिफ (केरळ)


६० किलो वजनी गट : 


तानाजी चौगुले (कर्नाटक), १) नितीन म्हात्रे (महाराष्ट्र अ), २) के. हरीबाबू (रेल्वे), ३) प्रतिक पांचाळ (महाराष्ट्र ब), ४) अंकूर (दिल्ली), ५) दिपू दत्ता (आसाम)


६५ किलो वजनी गट : 


१) एस. भास्करन (रेल्वे)
२) अनिल गोचीकर (ओडिशा)
३) मित्तलकुमार सिंग (दिल्ली)
४) टी. कृष्णा (मध्य प्रदेश) 
५) रियाज टी.के.(केरळ)


७० किलो वजनी गट :  


१) अनास हुसेन (रेल्वे) 
२) हिरालाल (पंजाब पोलीस)
३) राजू खान (दिल्ली)
४) धर्मेंदर सिंग (दिल्ली)
५) हरिश्चंद्र इंगावले (पुद्दुचेरी)


पुरूष फिजीक स्पोर्ट्स : 


१) चेतन सैनी (चंदीगड)
२) किरण साठे (महाराष्ट्र अ) 
३) रोहन पाटणकर (महाराष्ट्र अ)
४) वेस्ली मेनन (प. बंगाल) 
५) अनिल सती (उत्तर प्रदेश