नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला सर्वात चांगला मॅच फिनिशर आहे हे काही वेगळं सांगायला नको.तरीही श्रीलंकेच्या दौ-याआधी धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकेच नाही तर धोनीला निवृत्ती घेण्याचा सल्ला सुद्धा दिला गेला. पण धोनीने श्रीलंके विरूद्धच्या दुस-या आणि तिस-या वनडे सामन्यात दमदार खेळ करत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. रविवारी खेळल्या गेलेल्या तिस-या वनडे सामन्यात धोनीने ६७ रन्सची खेळी केली. या सामन्यात तो नाबाद राहिला आणि त्याने काही अनोखे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केलेत. 


धोनीने दुस-या वन डे नंतर तिस-या वन डे सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासोबतच धोनीने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेळा नॉट आऊट राहण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. धोनी हा सर्वात जास्त वेळ नॉट आऊट राहणा-या खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला. धोनी वन डे सामन्यांमध्ये एकूण ७२ वेळा नॉट आऊट राहिला आहे.  


नॉट आऊट रेकॉर्डची बरोबरी :


धोनीने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्तवेळ नॉट आऊट राहण्याच्या रेकॉर्डमध्ये चामुंदा वास आणि शॉन पोलाकची बरोबरी केली आहे. धोनी आतापर्यंत ७२ वेळा वन डे क्रिकेटमध्ये नॉट आऊट राहत परतला आहे. 


प्रतिस्पर्धी टीमने दिलेलं टार्गेट पूर्ण करताना धोनी ४० वेळा नॉट आऊट राहिला आणि यादरम्यान त्याने २७ वेळा टीमला विजय मिळवून दिला. तर धोनी टी-२० मध्ये एकूण ३३ वेळा नॉट आऊट राहिला. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी टीमने दिलेलं टार्गेट पूर्ण करताना तो १२ वेळा नॉट आऊट राहिला.  


रेकॉर्ड्स - 


महेंद्र सिंह धोनी - ४० 
जॉन्टी रोड्स - ३३
इंझमाम उल हक - ३२
रिकी पॉंटींग - ३१



टेस्ट मध्ये धोनी नॉटआउट -


टेस्ट सामन्यांमध्येही धोनी १६ वेळा नॉट आऊट राहिला आणि तीनवेळा त्याने दमदार खेळ करत टीमला विजय मिळवून दिला. धोनीने श्रीलंके विरूद्ध ६१ रन्सची खेळी केली. या खेळादरम्यान त्याने अनेक रेकॉर्ड्स केलेत. धोनी आता टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन्स करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. धोनीच्या पुढे या यादीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड हे आहेत.