धोनी बनला `शूरवीर`, भोजपुरीत दिली धमकी
मुंबई : भारताचा माजी कप्तान महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोयं.
धोनी या व्हिडियोमध्ये जुन्या योद्ध्याप्रमाणे कवच घातलेला दिसत. हातामध्ये बॅट आणि भोजपुरी बोलणारा धोनी यामध्ये दिसतोय.
यामध्ये धोनीचे केसही पूर्वीप्रमाणे मोठी दिसत आहेत.
योद्धा धोनी
लांब केस ठेवून धोनीने एक जाहीरात शूट केली. स्निकर्स चॉकलेटची ही जाहीरात आहे. ज्यामध्ये तो एखाद्या योद्ध्याप्रमाणे दिसतोय.
मजेदार लूक
धोनीचा हा मजेदार लूक सर्वांच्याच चांगला पसंतीस पडतोय. जाहीरातीच्या सुरूवातीस धोनी येतो आणि आपल्या डायलॉगमध्ये म्हणतो, ”आज हम उनके छक्के छुड़ा देंगे और हमका चाहि बदला”