IPL 2023, Devon Conway On MS Dhoni Fitness : महेंद्रसिंह धोनी यंदाच्या हंगामात निवृत्ती घेणार? धोनीचा (Mahendra Singh Dhoni) ही अखेरची आयपीएल (IPL 2023) आहे का? धोनी खेळणार की नाही? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. डेफिनेटली नॉट म्हणणाऱ्या धोनीच्या मनात आहे तरी काय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अशातच आता प्लेऑफआधी चेन्नईच्या डगआऊटमधून मोठी माहिती समोर आली आहे. क्वालिफायर 1 च्या आधी चेन्नईच्या डेव्हिड कॉर्नवेने (Devon Conway) मोठं वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी (MS Dhoni) खूप क्रिकेट खेळला आहे आणि त्याचा क्रिकेटमध्ये खूप आदर केला जातो. जर त्या विशालतेच्या व्यक्तीला तुमचा पाठिंबा असेल आणि तुम्हाला माहितीये की तो तुमच्यावर विश्वास ठेवतो तर तो तुम्हाला एक खेळाडू म्हणून खूप आत्मविश्वास देतो, असं डेव्हिड कॉर्नवे म्हणाला आहे. त्यावेळी त्याने धोनीच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धोनीचं कौतूक केलंय.


Mahendra singh Dhoni निवृत्ती घेणार?


माही भाई आमच्यासह तुमच्या टीममध्ये आहे, म्हणून आम्ही स्वत:ला लकी मानतो. मला आशा आहे की, हा त्याचा शेवटचा हंगाम नसेल. त्यासाठी त्याला किमान पाच वर्षे तरी आहेत, असंही डेव्हिड कॉर्नवे (Devon Conway On MS Dhoni) याने यावेळी म्हटलं आहे. 


Mahendra Singh Dhoni अजूनही अनफीट?


गुडघ्याच्या समस्येमुळे एमएस धोनी (MS Dhoni Fitness) पूर्णपणे फीट नाही, अशी चर्चा सुरू होती. चेपॉकवर खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीने पायाला पट्टी केली होती. त्यामुळे आता धोनी फीट नाहीये का? असा सवाल उपस्थित होतोय. त्यावर चेन्नईचा स्टार खेळाडू डेव्हॉन कॉनवे याने मोठा खुलासा केला आहे धोनीचा गुडघा आता पूर्णपणे ठीक आहे, त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वात आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास देखील त्याने व्यक्त केलाय.


आणखी वाचा - फक्त एवढं गणित जुळावं! ना RCB ना MI, नाकावर टिच्चून Rajasthan Royals क्वालिफाय करणार


दरम्यान, मी चेन्नईच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिलं तेव्हा जाणवतं की धोनीच्या स्वभावात काहीही फरक नाही. तो नम्र आहे. चर्चा करण्यासाठी त्याचे पर्याय नेहमी खुले असतात. मी जाऊन मला पाहिजे ते विचारू शकतो. ड्रेसिंग रूममध्ये तरुणाला याचीच गरज असते, असं म्हणत कॉर्नवेने धोनीचं गुणगान गायलं आहे.