नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी अलीकडेच चॉकलेट ब्रॅंड स्निकर्सचे ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे.


धोनी म्हणाला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी धोनीने सांगितले की, स्निकर्ससोबत जोडले गेल्यामुळे मी अतिशय आनंदीत आहे. हे चॉकलेट माझे पूर्वीपासूनचेच आवडते आहे. कारण याची चव अप्रतिम असून पोट भरण्यासाठी हे अतिशय योग्य आहे. या चॉकलेट ब्रॅंडच्या जाहिरातीत धोनी त्याच्या जुन्या अंदाजात दिसत आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये पर्दापण केल्यानंतर सुरूवातीच्या काळात जसा धोनीचा लूक होता तसाच यातही तो दिसत आहे.


व्हिडिओ व्हायरल


अलिकडेच धोनीने या जाहिरातीचे शूटिंग पूर्ण केले. यात धोनीचा बाहुबली अंदाज पाहायला मिळणार आहे. मैदानात नेहमी शांत दिसणाऱ्या धोनीचा मस्तीभरा अंदाज येथे पाहायला मिळत आहे. या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात धोनीचा डान्स पाहुन तुम्हाला नक्कीच हसू येईल.