मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी कायमचं चर्चेत असतो. कधी आपल्या मुलीच्या व्हिडीओमुळे तर बऱ्याचदा आपल्या क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे सर्वांच्या ओठावर माहीचं नाव असतं. मात्र आता माही चर्चेत आला आहे तो एका वेगळ्या लूकमुळे. त्याचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना माही सन्यास घेणार का असाही प्रश्न पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा माही कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या IPLसाठी तयारी करताना दिसत आहे. त्याआधीच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. माही या फोटोमध्ये भिक्षूकासारखा दिसत आहे. त्यानं मुंडण केलं असून वेगळ्या प्रकारची वस्त्र परिधान केली आहेत. 


स्टार स्पोर्ट्स या वाहितीने आपल्या ट्वीटरवर माहीचा एका 9 सेकंदाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये माही जंगलात भिक्षुसारख्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या नव्या अवतारामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप कळू शकलं नाही. मात्र त्याच्या या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 



आयपीएल 2021 चा पहिला सामना 9 एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. चेन्नई सुपर किंग्ज 10 एप्रिलपासून दिल्ली कॅपिटलच्या विरोधात खेळणार आहे. माहीची टीम IPLसाठी कसून तयारीला लागली आहे.


गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीचा IPL 2020 मधील प्रवास विशेष राहिला नाही. 14 सामन्यांमध्ये केवळ 200 धावा करण्यात माहीला यश आलं. यंदाच्या IPLसाठी मात्र पूर्ण तयारीने उतरण्याचा प्लॅन माहीचा असल्यानं IPLमधील रंगत वाढणार आहे.