बहिणीकडून Deepak Chahar ला हनिमूनसाठी खास टिप, म्हणाली, `फक्त पाठीची.......`
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर नुकताच विवाहबंधनात अडकलाय.
मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर नुकताच विवाहबंधनात अडकलाय. सध्या त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटपासून विश्वापासून अनेक माध्यमांतून त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. या शुभेच्छांच्या वर्षावात आता बहीण मालती चहरने दीपकला दिलेल्या शुभेच्छाची एकच चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय. (Malti chahar give honeymoon tips to Deepak Chahar and jaya bhardwaj)
दीपक चहरने 1 जून रोजी प्रेयसी जया भारद्वाजसोबत सात फेरे घेतले. आग्रा येथे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रीडा विश्वातील नातेवाईक आणि मित्रांनी हजेरी लावली होती.
दीपक चहरला सध्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. क्रिकेटविश्व आणि मित्र परीवारातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान, दीपकची बहीण मालती चहरनेही ट्विट करून भावाला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हनिमूनबाबत मजेशीर सल्ला देखील दिला. तिने सल्ला दिलेले ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
पोस्टमध्ये काय?
मालतीने भाऊ दीपक आणि वहिनी जयासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच लिहिले, 'आता मुलगी आमची आहे... दोघांनाही वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा. दीपक चहर हनीमूनमध्ये तुमच्या पाठीची काळजी घ्या, कारण तुम्हाला वर्ल्ड कपही खेळायचा आहे. या पोस्टसोबत मालतीने एक मजेदार इमोजीही शेअर केला आहे. या तिच्या पोस्टची खुप चर्चा रंगली आहे.
आयपीएलमधून बाहेर
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने चालू आयपीएल हंगामासाठी दीपकला कायम ठेवले नव्हते. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपयांची बोली लावून दीपकला विकत घेतले. या दरम्यान दीपकच्या पाठीला दुखापत झाली, ज्यामुळे तो चालू आयपीएल हंगामात एकही सामना खेळू शकला नाही.अद्याप त्याची दुखापत बरी झाली की नाही याची माहिती समोर आली नाही आहे. तर टीम इंडियाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कपही खेळायचा आहे
मालती आणि जया खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मालतीने आधीच जयाला तिची वहिनी म्हणून स्वीकारले होते आणि तिला भाऊ दीपकला भेटायला लावले होते. पाच महिन्यांच्या ओळखीनंतर दोघांमध्ये प्रेम जडलं. आयपीएल 2021 सीझनच्या एका सामन्यादरम्यान दीपकने स्टेडियममध्येच जयाला प्रपोज केले.