IPL 2021 : `बॉल सूखा है घूमेगा`, असे धोनीने बोलताच जडेजाकडून बटलर क्लिन बोल्ड. Viral video
मॅच मधली आणखी एक गोष्ट सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे राजस्थानचा फलंदाज जोस बटलरचा विकेट.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा त्याच्या खेळामुळे सध्या खूप चर्चेत आहे. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळलेल्या मॅचमध्ये एकूण 4 विकेट्स घेतले. त्याने 4 था विकेट घेतल्या नंतर ज्या प्रकारे सेलेब्रेशन केले त्याचा व्हिडीओ देखील बराच चर्चेत आला आहे. परंतु या मॅच मधली आणखी एक गोष्ट सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे राजस्थानचा फलंदाज जोस बटलरचा विकेट. हा विकेट तसा घेतला जडेजाने होता, परंतु त्याच्या या यशामागील खरी व्यक्ती महेंद्रसिंग धोनी आहे .
रवींद्र जडेजाने 12 व्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर जोस बटलरला क्लिन बोल्ड करुन 49 धावांवर रोखले आणि चेन्नई सुपर किंग्जला मोठे यश मिळवून दिले. जर जोस बटलर क्रीजवर थांबला असता तर, राजस्थान ही मॅच जिंकला असता.
धोनीने जडेजाला काय म्हटले?
चेन्नईचा कॅपटन महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी जोस बटलरचा विकेट घेण्याचा प्लॅन केला. खरेतर राजस्थानच्या फलंदाजीच्या वेळी चेंडूला दहाव्या ओव्हरमध्ये बदलावे लागले. त्यामुळे चेंडू थोडासा कोरडा होता. यानंतर, 12 व्या ओव्हरच्या सुरुवातीला धोनी जडेजाला म्हणाला, "चेंडू कोरडा आहे, तो फिरेल." जडेजाने आपले कौशल्य वापरुन पहिल्याच चेंडूवर बटलरला क्लीन बोल्ड केले. अशाप्रकारे धोनीच्या हुशारीने आणि जडेजाच्या कैशल्याने बटलरला मैदानावरुन चालले केले.
जडेजाने धोनीच्या निर्णयाला न्याय दिला
धोनीच्या म्हणण्यानुसार सुक्या चेंडूमुळे स्पिनर गोलंदाजांना चांगली मदत मिळते. आशा परिस्थितीत जडेजाने धोनीचे एकूण बटलरला क्लीन बोल्ड केले. धोनीने सामन्यानंतर सांगितले की, ओला चेंडूही फिरत होता, परंतु मिडविकेटवर फटका मारणे सोपे आहे. म्हणून त्याने चेंडू थोडासा वरती टाकावा अशी माझी इच्छा होती.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा धोनीचे एकूण जडेजाने याचा फायदा घेतला. या आधी ही धोनी चे आपल्या संघातील सदस्यांना अशा प्रकारचे सल्ले दिले आहेत आणि त्याचे व्हिडीआ देखील व्हायरल झाले आहेत. यामुळेच धोनी चातुर्यता आणि त्याचा अनुभव आपल्या लक्षात येतो. या व्हिडीओला आता 5.6 हजर पेक्षा जास्त व्यूव्हस मिळाले आहेत. तसेच धोनी चे चहाते त्या व्हिडीओवर कमेंन्ट्स चा वर्षाव करत आहेत.