मुंबई : आयपीएलच्या लिलावात बर्‍याच वेळा एखाद्या खेळाडूला वाजवीपेक्षा जास्त बोली लावली जाते तर, काही यामध्ये अनुभवी आणि महत्वाचे खेळाडू मागे राहतात. त्यांना कधी कमी पैश्यांत विकत घेतले जाते तर, कधी त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना सतत संधी मिळत असते. तर असे अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत जे संधीच्या शोधात तळमळ करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये सतत संधी मिळाल्यानंतरही आपला खेळ दाखवू न शकलेल्या मनन वोहराचे (मनन वोहरा) ही असेच आहे. हा पंजाबचा फलंदाज 2013 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे परंतु त्याने अजूनही आपली छाप उमटवली नाही. टॉप ऑर्डर फलंदाज म्हणून मनन वोहराची ओळख आहे आणि बहुतेक वेळा तो टॉप ऑर्डरमध्येच खेळला आहे. पण त्याच्या नावावर फक्त तीन आयपीएल अर्धशतके आहेत. 20 वर्षांचा आसताना मनन वोहराने आयपीएलमध्ये डेब्यू केला. या स्पर्धेतून त्याने एकूण 20 कोटी रुपये कमावले परंतु कमाईच्या तुलनेत त्याने आपला खेळ दाखवला नाही.


मनन वोहरा हा उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वात 2012 मध्ये अंडर19 वर्ल्ड कप जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य होता. एका वर्षा नंतर त्याला 2013 मध्ये, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या (आता पंजाब किंग्ज) संघा मधून आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, पंजाबने त्याला अडीज कोटी रूपयांत विकत घेतले. पहिल्या मॅचमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 43 अशी होती. त्याने ही खेळी 26 चेंडूंत खेळली.


यामुळे त्याने आपला खूप प्रभाव पाडला होता. परंतु त्यानंतर संपूर्ण सीझनमध्ये 12 सामने खेळल्यानंतरही त्याला 137.60 च्या सरासरीने 161 धावा करता आल्या. पण तो तरूण खेळाडू असल्याने पंजाबने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि चार कोटी रुपये देऊन त्याला संघात ठेवले. त्यानंतर आयपीएल 2014 to ते 2017 पर्यंत तो पंजाबबरोबर राहिला आणि त्याला वर्षाला चार कोटी रुपये मिळात राहिले.


दरम्यान, आयपीएल 2014 मध्ये त्याने सामन्यात एका अर्धशतकाच्या च्या मदतीने आठ सामन्यांत 324 धावा केल्या. आयपीएल 2015 मध्ये त्याने सात सामन्यांत 82, तर आयपीएल 2016 मध्ये अर्धशतक सह सात सामन्यात 161 आणि आयपीएल 2017 मधील 11 सामन्यात अर्धशतक सह 229 धावा केल्या.


पंजाबसाठी दोन महत्त्वपूर्ण डाव खेळला


पंजाबकडून खेळत मनन वोहराने आपली तीन अर्धशतके ठोकली. आयपीएल 2014 च्या अंतिम सामन्यात त्याने आपला खेळ दाखवला. या दरम्यान, त्याने ऋद्धिमान साहा सह 129 धावांची भर घालून संघाला 199 धावांपर्यंत पोहोचविले. परंतु अंतिम सामन्यात हा संघ कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाला. त्यानंतर आयपीएल 2017 मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 50 चेंडूत नऊ चौकार व पाच  सिक्यसह 95 धावा फटकावल्या. पण पुन्हा संघ हरला.


आरसीबीकडून फक्त एक सीझन नंतर बाय.. बाय


आयपीएल 2017 नंतर पंजाबने त्याला सोडले. तर आयपीएल 2018 च्या  लिलावादरम्यान आरसीबीने त्याला विकत घेतले. आरसीबीने त्याला 1.1 कोटी रुपयात विकत घेतले. येथे त्याने चार सामने खेळले आणि 55 धावा केल्या. त्यानंतर आरसीबीने त्याला सोडले. 


मनन वोहरा 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील झाला. राजस्थान रॉयल्सने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर विकत घेतले. येथे त्याला 2019 आणि 2020 मध्ये एकही सामना खेळायला मिळाला नाही. परंतु त्याने आयपीएल 2021 मध्ये तीन सामने खेळले आहेत आणि या साझनमधील 35 धावा त्याच्या खात्यात आहेत.