टाँटन : महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने शानदार शतक ठोकलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदनाने १०६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकार लगावताना शानदार शतक झळकावले. याआधी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही तिने अर्धशतकी खेळी साकारली होती. 


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना मानधनाने १०० चेंडूत ९० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या सामन्यातही संयमी खेळी करताना तिने अर्धशतक साकारलेय. पहिल्या दोन विकेट लवकर गमावल्यानंतर मंदनाने खेळपट्टीवर टिकून राहत दमदार खेळी केली.