Arjun Tendulkar : भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ने रणजी क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. रणजी ट्रॉफी 2022-23 सत्रामध्ये त्याने डेब्यू करत शतक ठोकलं होतं. यावेळी त्याने आपले वडील सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी देखील केली होती. मात्र गोष्ट इतक्यावर थांबली नसून अर्जुनने गोलंदाजीच्या माध्यमातून देखील त्याच्या खेळाची शैली दाखवली. यावेळी त्याच्यासमोर युवा खेळाडू नसून दिग्गज खेळाडू मयांक अग्रवाल आणि मनीष पांडे उभे होते.


कर्नाटकविरूद्ध Arjun Tendulkar ची उत्तम गोलंदाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या गोवा विरूद्ध कर्नाटक यांच्यामध्ये रणजी ट्राफीतला सामना सुरु आहे. कर्नाटक विरूद्धच्या सामन्यामध्ये अर्जुनने 26.2 ओव्हरमध्ये केवळ 79 रन्स देऊन 2 विकेट्स काढले. यावेळी अर्जुनने फॉर्ममध्ये असलेला ओपनर समर्थ आणि शुभांग हेगडे यांना पव्हेलियनमध्ये पाठवलं.


2022 हे वर्ष अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) च्या करियरसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या खेळाडूने चांगला खेळ दाखवला आहे. गोव्याकडून प्रथम श्रेणीत देखील त्याने उत्तम खेळ केला आहे. रणजी ट्रॉफी तसंच सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनच्या नावाची चांगली चर्चा होती. 


मनीष पांडेने ठोकलं द्विशतक


या सामन्यामध्ये कर्नाटकचा कर्णधार मयांक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ओपनर फलंदाज समर्थ आणि मयांकने पहिल्या विकेटसाठी 116 रन्स केले. त्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू मनिष पांडे यांने द्विशतक ठोकलं. 186 बॉल्समध्ये 14 फोर आणि 11 सिक्सच्या मदतीने 208 रन्सची खेळी केली. मात्र अर्जुन तेंडुलकरच्या कारनाम्यापुढे मनीष पांडे याचं द्विशतक फिकं पडलंय. 


झारखंड सामन्यातंही चमकला होता अर्जुन


गेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर बॉल टाकत झारखंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यामध्ये अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळणं फलंदाजांना सोप्पं गेलं नाही. तर अर्जुनने एका यॉर्कर बॉलवर शाहबाज नदीमला थेट क्लिन बोल्ड केलंय. हा यॉर्कर बॉलला नदीमला खेळताच आला नाही. 


शाहबाज नदीम फलंदाजी करत असताना अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. यावेळी अर्जुनने एक यॉर्कर फेकला, जो बॉल नदीमला समजलाच नाही आणि तो विकेट गमावून बसला. विकेट मिळाल्यानंतर अर्जुनने सेलिब्रेशन देखील केलं. अर्जुनने 26 ओव्हरमध्ये 3.46 च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत एक विकेट घेतली. 


डेब्यू सामन्यात अर्जुनने केलं होतं शतक


गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.