मुंबई : क्रिकेट हा एक असा खेळ आहे की, इथे खेळाडू कधी हिरो होतील आणि कधी खलनायक हे काही सांगू शकत नाही. काल आयपीएलमधील (IPL 2021) सहावा सामना आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. आरसीबीच्या टीमने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हा सामना जिंकला. तर हा सामना हरुन मनीष पांडे (Manish Pandey) आपल्या खराब फलंदाजीमुळे खलनायक ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर लोकं मनीष पांडेवर (Manish Pandey) इतके नाराज आहेत की, प्रत्येकजण त्याला संघातून काढण्याविषयी बोलत आहे. कारण लोकांनी हैदराबादच्या पराभवासाठी मनीष पांडेलाच जबाबदार धरले आहे. ट्विटरवरही लोक मनीष पांडे विरोधात बोलत आहेत. सनरायझर्सच्या या सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 37 बॅालमध्ये 54 धावा फटकावल्या, पण मनीष पांडेने 39 बॅालमध्ये 38 धावा  केल्या. मनीष पांडे ट्विटरवर आपल्या स्लो खेळासाठी ट्रोल होत आहे.




आरसीबीविरूद्ध मनीष पांडेची (Manish Pandey) फलंदाजी पाहून लोक म्हणाले की, याच्याकडून हे होणे शक्य नाही. पांडे जी टी -20 कसे खेळायचे हे विसरले आहेत. त्यांना कसे फलंदाजी करावी हे माहित नाही. आता जर सनरायझर्सच्या मधल्या फळीचा मजबूत आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाची अशी अवस्था होईल, तर मग संघ कसा जिंकू शकेल? काही लोकंतर त्याच्यावरुन मजेदार मीम्स बनवत आहेत. त्याचवेळी, काही चाहते त्याला प्लेइंग अकरामधून बाहेर काढण्याची मागणी करीत आहेत.




सोशल मीडिया यूझर्सचा राग तसा अनावश्यक नाही, कारण पांडेच्या खराब फलंदाजीमुळे हैदराबादला सामना गमवावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. आयपीएलमधील 2018 च्या सीझनपासून आतापर्यंत मनिष पांडेने आपल्या डावात 30 किंवा त्यापेक्षा जास्त बॉल खेळले आहेत. त्यापैकी 11 वेळा हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले. या सीझनमध्ये, तो सलग दुसर्‍या सामन्यात हैदराबादच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला आहे. पहिल्या सामन्यात तो स्कोरचा पाठलाग करताना शेवटपर्यंत नाबाद होता, पण त्याचा संघ मॅच जिंकू शकला नाही.