इंग्लंड : मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या  क्रिकेटच्या कायद्याच्या संरक्षकांनी रविवारी भारतीय खेळाडू दीप्ती शर्माने गोलंदाजीच्या शेवटी इंग्लंडच्या Charlie Dean केलेल्या रनआऊटवर मान्यतेची मोहर उमटवली. इंग्लंडची शेवटची फलंदाज चार्ली डीनला (47) गोलंदाजीच्या शेवटी क्रीज ओव्हरटेक करताना दिप्तीने रनआऊट केलं. यामुळे भारताला विजय झाला. 


दीप्ती शर्माने 'रनआऊट' करणं योग्य की अयोग्य?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीप्तीचा रनआऊट पूर्णपणे वैध होता, परंतु तरीही इंग्लंडच्या काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली परंतु एमसीसीने रविवारी त्यात काहीही चुकीचं नसल्याचे सांगितलं. "खरोखरच रोमांचक सामन्याचा एक असामान्य शेवट होता, ज्यामध्ये अधिकार्‍यांनी योग्य भूमिका बजावली होती." MCC ने एका निवेदनात असं म्हटलं आहे.


एमसीसीने दिला निकाल 


एमसीसीने म्हटलंय की, 'नॉन स्टायकर एंडला असलेल्या फलंदाजांना एमसीसीने म्हटलंय की, जोपर्यंत गोलंदाजाच्या हातातून चेंडू निघत नाही तोपर्यंत फलंदाजांना क्रीजवरच थांबावं लागणार आहे. हे बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.


यापूर्वीही अनेक प्रसंगी खेळाडूंनी अशाप्रकारे मंकडिंग केलं होतं, परंतु त्यानंतर आयसीसीने याला अयोग्य खेळाच्या श्रेणीत ठेवलं होतं. म्हणजेच अशा पद्धतीने आऊट करणं खेळाच्या भावनेच्या विरुद्ध मानलं जात होतं. परंतु नियमांनुसार, ते योग्य होते. या प्रकारचं रन-आऊट पूर्वी कायदा 41.16.1 (अनफेअर प्ले) मध्ये निर्धारित केलं होतं.



41.16.1 नुसार, जेव्हा गोलंदाजाला असं वाटतं की, नॉन-स्ट्रायकरच्या एंडला असलेला फलंदाज बॉल फेकण्‍याच्‍या खूप आधी क्रीज सोडतोय, तेव्हा गोलंदाज फलंदाजाला धावबाद करू शकतो. यामध्ये बॉलची नोंद होत नाही पण फलंदाज आऊट होतो.


मात्र आता आयसीसीने 41.16.1 कायद्यातून मंकडिंगला रन-आऊट नियम (38) मध्ये समाविष्ट केलं आहे. याचा अर्थ 1 ऑक्टोबरपासून मँकाडिंग करणं खेळाच्या भावनेच्या विरुद्ध होणार नाही आणि तो सामान्य रनआऊट मानला जाईल.