वानखेडेवर काय होणार? मनोज तिवारीने दिली वॉर्निंग- `हार्दिक पांड्या अजून मुंबईत यायचाय!`
Manoj Tiwari On Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं मुंबईच्या स्टेडियमवर कसं स्वागत होतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे. तसेच मनोज तिवारीने पांड्याचं कौतूक देखील केलंय.
Hardik Pandya Get Booed : मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) नियुक्ती केल्यानंतर आता त्याला फॅन्सच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अहमदाबादच्या पहिल्या सामन्यात पांड्या चांगलाच ट्रोल झाला. तर सोशल मीडियावर अनेक रिल्स देखील तयार झाल्या. पांड्याने रोहितला मुद्दामहून पळवलं, अशी देखील टीका त्याच्यावर केली गेली. अशातच आता मुंबईच्या वानखेडेवर होणाऱ्या 1 एप्रिलच्या सामन्यात मुंबईकर हार्दिकची शाळा घेणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारी (Manoj Tiwari) याने पांड्याच्या संयमाचं कौतूक केलंय.
नेमकं काय म्हणाला मनोज तिवारी?
हार्दिक पांड्याचं मुंबईच्या स्टेडियमवर कसं स्वागत होतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला वाटतंय की, वानखेडेवर त्याला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल. कारण मुंबईचा फॅन म्हणून किंवा रोहित शर्माचा फॅन म्हणून मी कधीच अपेक्षा केली नव्हती की, हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं जाईल, असं मनोज तिवारी म्हणतो. मी त्याला जेव्हा टीव्हीवर पाहिलं, तेव्हा तो खूप शांत दिसत होता. त्याचा संयम ही एक चांगली गोष्ट आहे. पांड्या ट्रोल झाला तरी देखील तो उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास देखील मनोज तिवारीने व्यक्त केला आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याची भूमिका एक ऑलराऊंडर म्हणून महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर त्याची फिटनेस टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी महत्त्वाची ठरेल, असंही मनोज तिवारीने म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईला पराभवाची धुळ चाखावी लागली. पहिला सामना गमावून हार्दिक पांड्याने रोहित शर्माची मागील 11 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हैदराबादविरुद्ध विजय मिळवून पांड्या विजयाता नारळ फोडणार का? असा सवाल विचारला जात आहे.
मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक
24 मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, हैदराबाद
1 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
7 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
11 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
14 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
18 एप्रिल - पंजाब किंग्ज वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मोहाली
22 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, जयपूर
27 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, दिल्ली
30 एप्रिल - लखनऊ सुपर जाएन्ट्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, लखनऊ
3 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
6 मे - सनरायझर्सं हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
11 मे - कोलकाता नाईट रायडर्सं वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, कोलकाता
17 मे - लखनऊ सुपर जाएन्ट्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई.