स्मृती मानधना ते यशस्वी जैस्वाल `हे` खेळाडू ठरले पाचव्या भारतीय क्रीडा पुरस्कारांचे विजेते!
Indian Sports Honours: खेळातील यश आणि ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धेमधील असामान्य कामगिरीचा या सोहळ्यात यथोचित सन्मान करण्यात आला.
भारतातील काही आघाडीच्या क्रीडा व्यक्तीमत्वांच्या आणि खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठेच्या भारतीय क्रीड सन्मानांची (इंडियन स्पोर्ट्स ऑनर आयएसएच) पाचवा सीजन ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. कॉर्नरस्पोर्ट्सच्या संकल्पनेतून उतरलेल्या सन्मान सोहळ्यास नामवंत सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी एकत्र येऊन भारताची ओळख करुन दिली. खेळातील यश आणि ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धेमधील असामान्य कामगिरीचा या सोहळ्यात यथोचित सन्मान करण्यात आला. मनू भाकर, नीरज चोप्रा, स्मृती मानधना आणि हरमनप्रीत सिंहह यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि त्यांच्या खेळाबद्दल असलेल्या अतुलनीय समर्पणाची ओळख म्हणून ज्युरींनी त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.
मनू भाकर या वेळी वैयक्तिक क्रीडा प्रकारातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली. या वर्षी पॅरिसमध्ये १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक कांस्यपदक अशी दोन पदके मिळवून मनूने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला. तिची अचूकता लक्ष आणि जागतिक स्तरावरील अभुतपूर्व यशामुळे तिला या खेळातील भारतातील सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक बनवले आहे.
या 'आयएसएच' सोहळ्यातील मनूचा हा दुसरा सन्मान होता. यापूर्वी २०१९ मध्ये मनूला उदयोन्मुख महिला खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. पुरस्कार जिंकल्यावर ती म्हणाली, मला हा सन्मान दिल्याबद्दल ज्युरी आणि भारतीय क्रीडा सन्मानांचे मी मनापासून आभार मानते. हा पुरस्कार माझा नाही. हे माझ्या कुटुंबासाठी , माझ्या प्रशिक्षकांसाठी आणि या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. भारताचा भालाफेक प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू नीरज चोप्राला वैयक्तिक क्रीडा खेळासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ऑलिम्पिक २०२० मधील सुवर्णपदक विजेता, जागतिक विजेता आणि पाठोपाठ ऑलिम्पिक रौप्यपदर, डायमंड लीग स्पर्धेतील दुसरे स्थान मिळविले. भारतीय खेळाडूंच्या नव्या पिढीला प्रेरणा देण्यात त्याची कामगिरी निर्णायक ठरते. त्यामुळेच आम्ही त्याचा सन्मान करत आहोत.
नीरज चोप्राचा देखिल हा दुसरा सन्मान होता. गेल्यवर्षी देखिल नीरजची याच पुरस्करासाठी निवड झली होती. सन्मानाला उत्तर देताना नीरज म्हणाला, मला पुन्हा एकदा या पुरस्कारासाठी पात्र धऱल्याबद्दल धन्यवाद. माझ्या संपूर्ण टीमचेही धन्यवाद. त्यांच्याशिवाय मी इथे असूच शकत नाही. स्मृती मानधनाला या वर्षात आपल्या फलंदाजीने केलेल्या दमदार कामगिरीसाठी सांघिक प्रकारातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. मानधनाची सातत्यपूर्ण कामगिरी, धोरणात्मक ताकद आणि महिला क्रिकेटला लोकप्रिय करण्यात प्रभावी भूमिका यामुळे सांघिक खेळातील प्रभावशाली खेळाडू म्हणून तिचे स्थान भक्कम झाले. स्मृती देखिल दुसऱ्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. यापूर्वी स्मृतीचे २०१९ मध्ये या पुरस्कारासाठी निवड झाली होती. स्मृती म्हणाली, हा पुरस्कार मिळविल्याचा केवळ आनंद नाही, तर अभिमानही वाटतो. मला आशा आहे की माझी निवड सर्व महिलांना नवी उंची गाठण्यासाठी प्रेरणा देईल.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याची सांघिक प्रकारातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याचा वाटा महत्वाचा होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने या वर्षी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही विजेतेपद मिळविले.
सर्व विजेते पुढील प्रमाणे
- वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (वैयक्तिक खेळ) - नीरज चोप्रा
- वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (वैयक्तिक खेळ) - मनू भाकर
- वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (टीम स्पोर्ट) - हरमनप्रीत सिंग
- स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (टीम स्पोर्ट) - स्मृती मानधना
- वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) - जसपाल राणा
- वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला) - सुमा शिरूर
- वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ (पुरुष) - भारतीय हॉकी संघ
- वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ (महिला) - बुद्धिबळ
- स्टार स्पोर्ट्स बिलीव्ह ऑनर - यशस्वी जैस्वाल
- पॅरा ॲथलीट ऑफ द इयर (पुरुष) - सुमित अंतिल
- पॅरा ॲथलीट ऑफ द इयर (महिला) - अवनी लेखरा
- एसएसएफ ग्रासरूट्स इनिशिएटिव्ह ऑफ द इयर ऑनर - मृदा एज्युकेशन युनिव्हर्सिटी
- पॉप्युलर चॉइस ब्रेकथ्रू परफॉर्मन्स ऑफ द इयर (पुरुष) - यशस्वी जैस्वाल
- पॉप्युलर चॉइस ब्रेकथ्रू परफॉर्मन्स ऑफ द इयर (महिला) - श्रेयंका पाटील
- वर्षातील लोकप्रिय क्लब - कोलकाता नाइट रायडर्स
- पॉप्युलर चॉइस फॅन क्लब ऑफ द इयर - मंजप्पाडा (केरळ ब्लास्टर्स)
- जीवनगौरव सन्मान - पद्मश्री मुरलीकांत पेटकर
या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या परिक्षक टीमचे नेतृत्तव भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नेमबाज अभिनब बिंद्रा यांनी केले. 'आयओए'च्या अध्यक्षा पीय टी. उषा, माजी अव्वल मानांकित नेमबाज अंजली भागवत, डिस्ने स्टारचे क्रीडा प्रमुख संजोग गुप्ता, बॉक्सर विजेंदर सिंग, कुस्तीगीर योगेश्वर दत्त, माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग यांचाही परिक्षक मंडळात सदस्य म्हणून समावेश होता.
या कामगिरीनंतर बिंद्राला सध्याच्या पिढीतील खेळाडूंबद्दल त्यांचे मत विचारले. बिंद्रा म्हणाला, 'या युवा खेळाडूंना भरपूर आत्मविश्वास बाळगावा. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन जिंकायचे आहे. त्यासाठी हा आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे.' तरुण पिढीसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत बोलताना बिंद्रा म्हणाले, 'माझ्या मते गेल्या दशकभरात देशात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. पण, अजून बरेच काही करायचे बाकी आहे. भारतातील ७० टक्के शाळांमध्ये खेळाचे मैदान नाही, हे ऐकून मला आश्चर्य वाटले. त्यामुळे शालेय स्तरावरील गोष्टी बदलण्याची गरज आहे. मात्र, सर्वोच्च पातळीवर खूप चांगले काम झाले आहे. '