WTC Final : ड्रेसिंग रूममध्ये शांत झोपला होता लाबुशेन; सिराजने 15 सेकंदात केलं झोपेचं खोबरं
WTC Final : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. वॉर्नर ( David Warner ) बाद झाल्याचं पाहताच लाबुशेन खाडकन जागा झाला आणि बॅट उचलत मैदानाकडे धावू लागला.
WTC Final : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रंगला आहे. आज या सामन्यात तिसरा दिवस होता. टीम इंडियाची ( Team India ) फलंदाजी 296 रन्सवर आटोपली. यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा फलंदाजीला मैदानात उतरली. यावेळी अवघ्या 2 रन्सवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट गेली. ही विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगनंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 रन्सची आघाडी मिळाली. खेळाच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner ) रूपाने ऑस्ट्रेलियाच्या टीमने त्यांची पहिली विकेट गमावली. एक विकेट गेल्यानंतर वन डाऊन मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) फलंदाजीसाठी येणार होता. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) दुसऱ्या इनिंगमध्ये अवघ्या 1 रनवर बाद झाला. यानंतर लगेचच मार्नस लॅबुशेनला ( Marnus Labuschagne ) झोप बाजूला ठेऊन फलंदाजीला यावं लागलं.
ड्रेसिंग रूमबाहेर झोपला होता लाबुशेन
फलंदाजीला येण्यापूर्वी मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) ड्रेसिंग रूमच्या बाहेर खुर्चीवर पाय सोडून शांत झोपला होता. मात्र ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु होताच वॉर्नर बाद झाला. वॉर्नर ( David Warner ) बाद झाल्याचं पाहताच लाबुशेन खाडकन जागा झाला आणि बॅट उचलत मैदानाकडे धावू लागला.
लाबुशेनची ( Marnus Labuschagne ) ही अचानक उडालेली तारांबळ कॅमेरातमध्ये कैद झालीये. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते मात्र याची मजा घेतायत.
सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
कांगारूंच्या टीमने पहिल्या डावात सर्वबाद 469 रन्स केले. यावेळी स्टीव्ह स्मिथने 268 बॉल्समध्ये 121 रन्सची खेळी केली, तर ट्रॅव्हिस हेडने 174 बॉल्समध्ये 163 रन्सची खेळी केली. प्रत्युत्तरात पहिल्या डावात भारताची कामगिरी खूपच निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणेशिवाय रवींद्र जडेजाला 48 रन्सची खेळी करता आली. तर शार्दुल ठाकूरने 51 रन्स केले.