केपटाऊन : महिला क्रिकेट संघ आज रात्री दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. पाच फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान तीन वन डे आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची सीरिज भारतीय महिला संघ दौऱ्यात खेळणार आहे. 


सचिननने घेतली महिला क्रिकेट संघाची भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या दौऱ्यापूर्वी भारतीय महिला संघाने बीकेसीवर कसून सराव केला. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला क्रिकेट संघाची भेट घेतली. त्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. महिला क्रिकेट संघासोबत सेल्फीही काढले. त्यामुळे संघाचं मनोबल चांगलंच उंचावलं.