मुंबई : आयपीएलमध्ये 42 वा सामना लखनऊ विरुद्ध पंजाब झाला. हा सामना पंजाब 20 धावांनी पराभूत झाले. पंजाब टीमचा हा पाचवा पराभव आहे. या सामन्यात मयंक अग्रवाल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. टीम इंडियाच्या खेळाडूंना नक्की झालंय काय? असा प्रश्न पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली पाठोपाठ आता टीम इंडियाचा दुसरा खेळाडू मयंक अग्रवाल संपूर्ण हंगामात फ्लॉप ठरला आहे. मयंकच्या बॅटमधून म्हणाव्या तेवढ्या धावा निघाल्या नाहीत. त्याच्या खराब कामगिरीमुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. 


आयपीएलचे मागचे काही रेकॉर्ड पाहता मयंक 3 सीरिज खूप चांगलं खेळला होता. आतापर्यंत तो 108 सामने खेळला आहे. त्याने 2292 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 12 अर्धशतक केले आहेत. 


मयंक अग्रवालने या हंगामात आतापर्यंतच्या सामन्यात 161 धावा केल्या आहेत. मयंक लखनऊ विरुद्ध सामन्यात 25 धावा केल्या आणि तंबुत परतला. मयंकचा हा खराब फॉर्म पाहता त्याला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी देणार की नाही याची शंका आहे.