मुंबई : स्पोर्ट्स अँकर मंयती लँगरने एक अँकर म्हणून एक वेगळी ओळख मिळवली आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. क्रिकेटसोबतच ती इतर खेळांच्या दरम्यानही अँकरिंग करतांना दिसते. मंयती सध्या स्टार स्पोर्ट्सवर अँकरिंग करते आहे. पण मंयतीची अँकर शिवाय एक वेगळी ओळख देखील आहे. मंयती एका क्रिकेटरची पत्नी आहे. हे कदाचित अनेकांना माहिती नसेल. कोण आहे तो क्रिकेटर? अँकर मंयती तिच्या पर्सनॅलिटी आणि तिच्या क्लाससाठी ओळखली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंयती ही भारतीय क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. मयंती लँगर आणि स्‍टुअर्ट बिन्‍नीचा विवाह 2012 मध्ये झाला होता. स्टुअर्ट बिन्नी हा माजी क्रिकेटर रॉजर बिन्नींचा मुलगा आहे. मयंतीने दिल्‍ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून ग्रॅज्यूएट केलं आहे. मयंती कॉलेजच्या दरम्यान फुटबॉल टीममध्ये होती. नंतर ही फुटबॉल अँकर झाली. गेस्ट अँकर म्हणून ती प्रसिद्ध झाल्यानंतर स्‍पोर्ट्सच्या फुटबॉल कॅफेची ती एसोसिएट प्रोड्यूसर बनली. मयंती एडवर्टाइजिंग किंवा ग्राफिक डिजाइनिंग क्षेत्रात जावू इच्छित होती. मंयती म्हणते की ती खूप कमी बोलते आणि करिअरकडे जास्त लक्ष देते.



मयंतीने 2013 मध्ये इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये देखील अँकरिंग केली.  2011 क्रिकेट वर्ल्‍डकप होस्‍ट करणारी अँकर देखील मंयती लँगर होती. मयंतीने 2010 मध्ये दिल्‍लीतील कॉमनवेल्‍थ गेम्‍स देखील चारू शर्मा सोबत होस्ट केला.