मुंबई : Mumbai Cricket Association Election : राजकारणात कधी काय होईल, हे कोणालाच सांगता येणार नाही. राजकारणात विरोधक असणारे एकाच व्यासपिठावर दिसणार आहेत. निमित्त आहेत मुंबई क्रिकेट असोसिएन निवडणुकीचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणात विरोधात पण क्रिकेटच्या मैदानात एकमेकांच्या हातात हात. हे चित्र आज दिसणार आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. निमित्त आहे ते मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थातच एमसीए निवडणुकीचे. विविध राजकीय पक्षांचे पुढारी आज या निवडणुकीनिमित्त एकत्र येणार आहे. खासकरुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत. 


राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर हे तिघंही स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत.  एमसीएसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनेल उभं केले आहे. अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे रिंगणात आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट ग्रुपकडून अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले माजी क्रिकेटर संदीप पाटलांसमोर पवार-शेलार महाआघाडीचे आव्हान असेल.