WPL 2023: महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना रंगला. दोन्ही टीम जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसल्या. मात्र यावेळी एक अशी घटना घडली, ज्याची सगळीकडे चर्चा होतेय. या सामन्यामध्ये दिल्लीची फलंदाजी सुरु असताना अंपायरकडून एक चूक झाली. दरम्यान या चुकीमुळे दिल्लीच्या टीमचं मोठं नुकसान झालं. परिणामी दिल्लीची कर्णधार मेग लैनिंग (Meg Lanning) थेट मैदानावरील अंपायरशी भिडली.


अंपायरच्या चुकीची शिक्षा दिल्लीला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वुमेंस प्रीमियर लीग (WPL 2023) च्या पहिल्या सिझनमध्ये अंपायरचा स्तर हा मुद्दा चांगलाच गाजतोय. नवे नियम लागू करून देखील या टूर्नामेंटमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले गेलेले दिसले. याची प्रचिती दिल्ली विरूद्ध मुंबईच्या सामन्यामध्ये पहायला मिळाली. अंपायरच्या एका चुकीची शिक्षा दिल्लीच्या टीमला भोगावी लागली.


अंपायरशी भिडली मेग


मुंबईविरूद्ध टॉस जिंकल्यानंतर दिल्लीच्या टीमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान फलंदाजीला आलेल्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली. अवघ्या 5 रन्सवर 3 प्रमुख खेळाडू पव्हेलियनमध्ये परतले होते. यावेळी दिल्लीच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मेग लॅनिंग स्ट्राइकवर होती आणि सीवर ब्रन्ट गोलंदाजी करत होती.


ब्रन्टच्या बॉलवर मेगने कट शॉट मारून फोर मारली. मात्र यावेळी अंपायरचं लक्ष नव्हतं आणि त्यांना याला डेड बॉल असा करार दिला. यानंतर मेग संतापली आणि थेट अंपायरकडे पोहोचली. यावेळी तिने अंपायरशी या कारारावरून वाद देखील घातला. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण अंपायरने हा निर्णय मागे घेतला नाही.